सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले. ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.
जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. “मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, “गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.
सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुधीर भटांचे निधन 16 नोव्हेंबर 2013 रोजी झाले.