जगातल्या सर्वच देशांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेलीही. मात्र अनंत काळापासून सकल ब्रम्हांडावर राज्य करणारे, संपूर्ण बहुमत असलेले, अलौकिक, एकमेवाद्वितीय अढळ व स्थिर सरकार म्हणजेच “स्वर्गाचे सरकार”
या सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप एकदाच झालेय. त्यात पुन्हापुन्हा बदल होत नाही. कोणताही मंत्री दुसर्या मंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. सगळेच मंत्री कार्यक्षम असल्यामुळे एकमेकांच्या तक्रारीसुद्धा करत नाहीत.
• राष्ट्रपती — श्री दत्तात्रेय
• पंतप्रधान — श्री महादेव
• निर्माण – श्री ब्रह्मदेव
• बांधकाम – श्री विश्वकर्माजी
• अर्थ व संपत्ती – श्रीमहालक्ष्मी
• गृह, धर्म व सुव्यवस्था – श्रीविष्णू
• अध्यक्ष – श्रीगणेश
• संरक्षण – श्रीहनुमान
• विकास – श्रीपवनदेव
• शिक्षण व समाजकल्याण- श्रीसरस्वती
• कृषी व जल – श्रीवरुणदेव
• अन्नपुरवठा – श्रीअन्नपूर्णा(पृथ्वी)
• आरोग्य – श्रीअश्विनीकुमार
• सिंचन व पाणीपुरवठा – श्रीइंद्रदेव
• माहिती व संदेश प्रसारण – देवर्षी नारद
• गुप्तचर यंत्रणा – श्रीसूर्यदेव
• परराष्ट्र व विदेश – श्रीरत्नाकर (समुद्र)
• न्याय मंत्री — श्रीयमराज
• कायदा व संविधान — श्रीशनिदेव
• सेनापती — श्रीकार्तिकेय
• ऊर्जा व इंधन –श्रीअग्निदेव
• अस्त्र व शक्ती – श्रीदुर्गा(आदिशक्ती)
हा फलक केवळ उमरगा येथील दत्त मंदिरात पहावयास मिळेल.
Leave a Reply