तारकापुंजाचे कौतुक व्हावे,
चंद्राचे तर नेहमीच असे,
अवतीभोवती चांदणं घोळका,
तरच चंद्र उठून दिसे,–!!!
खरेतर चंद्रावरती, डाग किती,
चांदणे केवढे असते निखळ,
लुकलुकण्याची किमया त्यांची,
चंद्राच्या तर न गावी निव्वळ,–!!
नियम दुनियेचा कठोर असे
मोठा तोच पुढे येतो,
लहानांना विसरती सारे,
मोठेपणाच श्रेष्ठ ठरतो,–!!!
चांदण्यांची सैर चालू,
अहोरात्र, दिनांतरी,
चांदव्याचा खेळ चालतो,
आमुच्याशी निरंतरी,–!!!
ढगाढगांतून तो लपतो,
करीत रासलीला,
एकेकीशी चांद खेळतो,
चांदण्या बनती गोपिका,
फेर धरुन त्याच्याभोवती,
जी ती तारका नाचते,
अनुरागाचे अमृत पाजत,
त्याला संतुष्ट करते,–!!!!
कधीतरी दखल घ्यावी,
दुनियेने आमुचीही,
आमच्यावाचून आभाळाचा,
पट रिकामाच राही…..!!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply