नवीन लेखन...

चिंच

भारतात चिंच सर्व लोकांना माहीत असते पण ते भारतात कुठून व कसे आले, हे समजणे कठीणच. साधारणपणे चिंच दक्षिण आशियात झाला असावा. चिंचेचे झाड अगदी शोभिवंत तसेच डेरेदारपण असते. हे साधारण ८० फुटाचे आसपासच असते. मात्र यांच्या फांद्या वाकड्या तिकड्या वाढत असतात. चिंच फळ मात्र बारामाहीच असावे, कारण चिंचेला विशेष बहर असे येतातच, असे नाही. कच्ची चिंच हेदेखील साधारणपणे हिरवेगार दिसते. ही चिंच खाली तर थोडी तुरट आंबट अशीच असते. मात्र चिंच उन्हाळ्याच्या आसपास जोर धरतात. थोड्याशा उन्हामुळे चिंचेचे वरचे आलेले थोडे कवच थोडेफार तडकते. अशी तडकलेली चिंच साले काढून टाकल्यास साधारण तांबूस रंगाची फळे दिसतात. ताजी चिंच खावयास थोडी आंबट व गोड अशी लागते. ग्रामीण भागात शाळकरी मुलांना हिंडणे व दगडाने चिंच पाडून खाणे हा मुलामुलींचा छंदच असतो. मात्र चिंच हे सर्व गुणामध्ये अत्यंत औषधी असते. चिंचेत जीवनसत्त्वे, खनिजे तसेच फायबर भरपूर प्रमाणात असतात. चिंचेमध्ये खनिजद्रव्येदेखील भरपूर प्रमाणात असतात. यात तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त आणि मॅग्नेशियम यांचा भरणाही खूप होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात पोटॅशियम हे सर्वात जास्त प्रमाणात आढळते. यात रक्तदाब कमी होत  जातो. तसेच चिंचेत असलेले लोह हेदेखील भरपूर प्रमाणात असतात. आणि त्याने रक्तातील लाल पेशी (रेड ब्लड सेल) भरपूर प्रमाणात वाढतात तसेच हेमोग्लोबिन पण वाढते. जीवनसत्त्वामध्ये चिंचेला व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी २, नियासीन व व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. साधारण आपल्या उन्हाळ्याच्या दिवसात चांगली चिंच दारावर येत असतात. अशा चिंचा चिंचोके बाहेर काढून ते फोडून त्यात थोडे मीठ घातात व याचे चिंचेचे गोळे तयार करतात. मात्र हे चिंचेचे गोळे बरेच दिवस ठेवतात मात्र अशा प्रकारचे चिंचेचे गोळे काही दिवसांनी खराब होतात व चिंचेचा कोळ एकदम काळा पडतो. शास्त्रज्ञाच्या मते असे गोळे जास्त दिवस वापरू नयेत कारण त्यांना वास येतो व कालांतराने आरोग्यास चांगले नसते चिंचेचा उपयोग भारतामध्ये अनेक प्रकारे केला जातो. महाराष्ट्रात चिंच सगळीकडे वापरतात. दक्षिण भारतात चिंच रस्सम म्हणूनच वापरतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..