हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.
2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85–150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.
माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140–240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90–140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.
आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100–200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85–140 होते
वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.
ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे—एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8–10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत
ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे–पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे, सनसिटी रस्ता, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे
फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk
Sir khup informative ….ty for this information