प्रवेश २ रा.
मंदार – आई आणि बाबा सोफ्यावर बसलेत.तिघांच्या हातात चहाचे कप.टीपॉयवर बिस्किटांची डिश.
मंदार – लवकरच निघालो.हायवेला गर्दी नसते एव्हढया पहाटे म्हणून तीन तासात आलो.तुम्ही तयार आहात हे बरं झालं.
बाबा – त्या डॉक्टरचा पत्ता आहे ना तुझ्याजवळ?
मंदार – हो.फोन नंबरही आहे.इन फॅक्ट आत्ता फोनवरून त्यांची अपॉइंटमेंटसुध्दा घेणार आहे मी.इथून चर्चगेटला जायला दोन तास तरी लागतील आपल्याला.
आई – फी किती आहे त्यांची? भरपूर पैसे घेऊन ठेव.शेखर काय सांगत होता आणखी?
मंदार- अगं नवीन बाळाचा पायगूण खूप चांगला आहे असं म्हणत होता तो.परवाच मोठा फ्लॅट मिळाला त्याला कंपनीतर्फे.गेली सहा महिने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ट्राय करीत होता तो.तेही आता मिळालं. लगेच टोयोटा घेतली.
बाबा – खरच.नशीब घेऊनच जन्माला येणार आहे आपला नातू.
आई – नातू की नात?
बाबा – कोणी का असेना.आपली बाबी खरी भाग्यवान.सोन्यासारखा नवरा मिळवलाय तिने.
आई – आपली मुलं काय कमी भाग्यवान आहेत?
बाबा – अगं आपल्या सुना लकी म्हणून असे कर्तबगार नवरे मिळाले त्यांना.
मंदार – (मोबाइल काढून डॉक्टरांना फोन लावतो.) मे आय स्पीक टू डॉक्टर वर्मा? आय अॅम मंदार भिडे फ्रॉम डोंबीवली.मे आय गेट युवर अपॉइंटमेंट टुडे प्लीज?…फॉर माय पेरेंटस*अराऊंड सीक्स्टी प्लस. यस.फॉर मस्कत व्हिसा.अराऊंड ३? ओके. थँक्स.) बाबा आपल्याला डॉक्टरांनी दुपारची तीनची वेळ दिली आहे.वेळ भरपूर आहे आपल्याला. मॉड कॅफची आयडिया कशी आहे बाबा?
बाबा – तुमने हमारी दिलकी बात छीन ली बेटा.बरेच दिवसात गेलो नाही तिकडे. आज तिकडेच जेऊ.
आई – वेळ आहे ना ! मग पोहे करते खायला.
मंदार – खरच. मनकवडी आहेस तू. मी तेच सांगणार होतो आत्ता.
बाबा – आता पोहे खाऊन बाहेर चक्कर टाकून येतो.तूही जाऊन ये.हॉटेलमधे जायचं म्हणजे चांगली
भूक लागायला हवी.
भूक लागायला हवी.
मंदार – यस. मीही चारूच्या दुकानात जाऊन येतो. नवीन सीडी आल्यत का तेही बघता येइल.
आई – लहान मुलांसाठी छान छान गाण्यांच्या सिडया मिळाल्या तर बघ रे. छकुसाठी घेऊन ये दोन चार.
Leave a Reply