प्रवेश ५ वा.
मस्कतवरून आल्यानंतर आणि सर्व मुलं सुना आपापल्या घरी गेल्यानंतर नेहेमी प्रमाणे सकाळचे वेळी चहा पीत अनंतराव आरामखुर्चीवर पेपर वाचीत बसले आहेत.बाजूला वत्सलाबाईंचा चहाचा कप ठेवलाय.त्याही पेपरचं एक पान वाचीत आहेत.
अनंतराव – बाबी सुखरूप बाळंत झाली.आपल्याला नातू झाला.एक अंक संपला.आपलं नेहेमीचं सुरू.
वत्सलाबाई – .अहो हे पाहीलंत का.. एका म्हातारा म्हातारीने एकमेकांच्या सम्मतीने घटस्फोट मिळवला….
मी काय म्हणते
मी काय म्हणते
अनंतराव – आलं लक्षात.आपणही घटस्फोट घ्यायचा? घरातल्या घरात ?
वत्सलाबाई – घरातल्या घरात का म्हणून? तुमच्याकडून पोटगी मिळेलच की तुम्ही जा वृध्दाश्रमात.
अनंतराव – मला असं वाटतं*…रादर मी असं ऐकलं आहे की घटस्फोट होण्यापुर्वी आपण दोघांनी एकमेकांपासून
वेगवेगळं रहाणं आवश्यक आहे.तू रहा इथे. मी जाईन वृध्दाश्रमात.
वेगवेगळं रहाणं आवश्यक आहे.तू रहा इथे. मी जाईन वृध्दाश्रमात.
वत्सलाबाई – तसं असेल तर आपण काहीतरी करून भांडत राहीलं पाहिजे. चार लोकांना कळायला हवं की आपलं एकमेकांशी पटत नाही.
अनंतराव – चार लोक जाऊ देत.शेजारच्या यमुनाबाईंच्या कानावर गेलं तरी पुरे. त्या गावभर कर्णा घेऊन फुंकतील.
वत्सलाबाई – . पण त्यांचा वासू….आपल्या दिपूचा खास मित्र आहे.शिवाय टेलीफोन एक्स्चेंजमधेच आहे तो. त्याच्याकानावर जर हे गेलं तर आपल्या दिपूला समजायला वेळ लागणार नाही.
अनंतराव – मग तर फारच बरं. त्याचा लगेच फोन येइल आपल्याला.
वत्सलाबाई – येऊ द्या की त्याचा फोन. मी उचलला तर तुम्ही वृध्दाश्रमात गेलेत म्हणून सांगीन. तुम्ही उचलला तर मी कुठेतरी बाहेर गेले म्हणून सांगा.
अनंतराव- हे जर त्याला कळलं तर धावत येइल तो इकडे. नाहीतर मंदारला तातडीने पाठवील.
वत्सलाबाई – कोणी का येइना. आपण जेव्हढयास तेव्हढं बोलायचं. आपलं काही ठीक नाही हे कळायला हवं.
अनंतराव – गुड आयडिया.मी एक ड्राफ्ट लेटर बनवून ठेवतो.ते तू वाचून माझ्या ड्रॉवरमधे लपवून ठेव. दिपू किंवा मंदार आला की माझ्या नकळत ते पत्र त्यांना दाखव. घटस्फोटाचा विचार चालू आहे हे त्यांना कळलं तर किती मजा येईल.
वत्सलाबाई – त्यांना कळलं तर मला पाठवतील नागपूरला आणि तुम्ही जाल पुण्याला.
अनंतराव – आपल्याला तरी काय हवं दुसरं….त्या निमित्ताने तरी आपली ताटातूट होइल.आता आपण भांडण्याची प्रॅक्टीस करू.
वत्सलाबाई – हज्जारदा सांगितलं तुम्हाला….कुठे शेण खायचंय ते खा बाहेर जाऊन.जर का ती बयो इथे आली तर….
अनंतराव – कोण बयो?
वत्सलाबाई – रिहर्सल हो.भांडणाची सुरूवातच करून टाकली.
अनंतराव – व.पुं नी म्हटलंय ते खरंच आहे.भांडावं कसं ते बायकांना शिकवावं लागत नाही. आपल्या डोंबीवलीत भांडकुदळ जोशींसारखा क्लास आहे का ते पाहून येतो.
Leave a Reply