प्रवेश ८ वा.
रात्रीची वेळ. जेवणं आटपून मंदार आणि बाबा आतल्या खोलीतून बाहेर येताहेत. बाबा त्याला सुपारी देतात व स्वतः तंबाखूची डबी काढून चुना तंबाखू एकत्र करून खाण्याची अॅक्शन करीत ‘भेटले का विलासराव’ असं विचारतात.
मंदार – हो तर. उद्या सकाळी दहा वाजेपर्यत तुम्हा दोघांना भेटायला बोलंवलंय त्यांनी त्यांच्या कंन्सल्टींग रूमवर.
आई – तू नाही येणार आमच्याबरोबर?
मंदार – नाही. मला संध्याकाळी बोलवलंय त्यांनी. मी उद्या बाहेरच जेवीन.
बाबा – ठीक आहे. जाऊ आम्ही उद्या त्यांच्याकडे. पाहू तरी काय तोडगा काढतात ते.
प्रवेश ९ वा.
रात्रीची वेळ.
मंदार – आई, बाबा, विलासकाकांनी तुमची केस नीट स्टडी करून एक सजेस्ट केलंय….बाबा तुम्ही काही दिवस
नागपूरला अण्णाकडे रहायचं आणि आई…….तू माझ्याबरोबर पुण्याला यायचं.
नागपूरला अण्णाकडे रहायचं आणि आई…….तू माझ्याबरोबर पुण्याला यायचं.
बाबा – तूर्त हा उपाय ठीक वाटतो.
आई – पण दिपूला सांगितलंस का?
मंदार – हो….त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यालाही हे पसंत पडलं. स्व्प्नीलची मुंज इथेच करायची हे ठरवून तो सहकुटुंब एकदोन दिवसात येतोच आहे.
बाबा – तूर्त डायव्होर्स पोस्टपोन्ड.
आई – आणि ताटातूटही पोस्टपोन्ड.
मंदार – असू दे. ‘कायद्याचं बोला’ मस्त आहे की नाही? (आई बाबा चमकून एकमेकांकडे पहातात.) मी त्याच सिनेमाला गेलो होतो. तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला. विलासकाकांनी काहीतरी सॉलिड युक्ती केलेली दिसत्ये असं वाटून मी त्यांना भेटलो. त्यावेळी मला खरी हकीकत समजली. मग मी अण्णालाही फोनवरून सगळं सांगितलं. त्यालाही उपरती झाली. विरहाशिवाय प्रेमाची भूक वाढत नाही असं म्हणाला अण्णा. तुमच्या घटस्फोटाला आम्हीच जबाबदार आहोत असं आम्हा दोघांना वाटतंय आता. तेव्हा तुमची ताटातूट हेच आमचं प्रायश्चित्त.
बाबा – चला मुंजीनंतर का होइना आपलं मिशन सक्सेसफुल होणार.
आई – तुमच्या दोघांच्या आवडीच्या डाळींब्या केल्यात. आता सुखाने भरपूर जेवा.
लेखकः श्रीराम शरदचंद्र बर्वे
बी १०२ ऋतुरंग अपार्टमेंट डी पी रोड
भारतीय विद्याभवन शाळेमागे
कोथरूड पुणे ३८
टेलिफोन – ०२०-२५३९८७६३
बी १०२ ऋतुरंग अपार्टमेंट डी पी रोड
भारतीय विद्याभवन शाळेमागे
कोथरूड पुणे ३८
टेलिफोन – ०२०-२५३९८७६३
Leave a Reply