‘…किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ‘
भूपेंद्र आणि आशा भोसले यांचे गाणे चालू होते ..आणि ती माझ्या डोळ्यासमोर आली .
डोळ्यासमोर म्हणजे प्रत्यक्षच माझा विश्वासच बसत नव्हता .अजून तशीच होती.
उंच , सडपातळ, जास्त जाड नाही पण दिसायला मध्यम .आमची फ्रेडनशीप कॉलजमधली कॉलेज संपले आणि सगळे विखुरले गेले.
सात-आठ वर्षाने बघतोय तिला.गळा रिकामा होता. म्हणजे लग्न नाही.तिच्या मैत्रिणीबरोबर आली होती .
गाणे संपता संपता तिचे लक्ष माझ्याकडे गेले , कारण मी तिच्याकडेच बघत होत.
तिने हात वर केला. मी पण.तशी तिने मला तिच्या टेबलवरबोलवले .मी गेलो, खात खात हातात डिश घेऊन.वेटरला म्हणालो ते पाणी वगैरे घेऊन ये…
ती म्हणाली तू अजून तसाच आहे हा , मी म्हणालो.तिने तिच्या मैत्रिणीची ओळख करून दिली.
हाय-हॅलो झाले.
तशी मैत्रिण म्हणाली येतेस का मला घरी जायचे आहे…तिने माझ्याकडे बघीतले. ती समजून गेली.मैत्रीण पण चॅप्टर होती. तुम्ही बसा मी निघते.
ती गेली. आमच्या गप्पा सुरु झाल्या. बरेच काही त्याच्या आयुष्यात घडले होते.ती सांगायला टाळत होती.मी पण जोर मारला आहे.
मी अजून सडाच होतो तशी ती पण सडीच.
एकमेकांचे नंबर घेतले.तिला वाटेत रस्त्यात सोडले.मी पुढ़े निघालो.
तिचा फोन वाजला..
काय झाले , मी विचारले ती म्हणाली ..
नाही रे…
नंबर कन्फर्म केला.
मी डोक्याला हात लावला…
आणि माझ्या गाडीने मजबूत वेग घेतला…
आणि विचारांनी देखील….
व्हॉट इज नेक्स्ट… ?
सतीश चाफेकर
Leave a Reply