द के. डी. सिंग बाजू स्टेडियम हे भारतातील लखनौ शहरात आहे. हे मैदान हॉकीचे मैदान म्हणूनही ओळखले जाते. प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू के. डी. सिंग यांचे नाव या मैदानाला देण्यात आलेले आहे.
हॉकी प्रमाणेच हे मैदान कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. लखनौ शहरातील खालच्या बाजूला असलेल्या आणि अतिशय “गजबजलेल्या हजरतगंज या भागात हे स्टेडियम उभारलेले आहे. हा भाग लखनौ शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बहुतेक खेळांचे सर्व सामने हे या मैदानावर होत असत.
परंतु नंतर ते बदलून प्रमुख मैदान म्हणून युनिव्हर्सिटी मैदानाचा उपयोग केला जाऊ लागला. द के. डी. सिंग बाबू स्टेडियम पासून युनिव्हर्सिटी ग्राउंड हे अगदी जवळच्याच अंतरावर आहे. या मैदानाची स्थापना १९५७ साली झाली. लखनौच्या संघाचे ते होम ग्राउंड आहे. या मैदानाची आसन क्षमता २५,००० इतकी आहे.
या मैदानावर उत्कृष्ट अशी प्रकाशझोतांची व्यवस्था दिवस-रात्र सामन्यांसाठी करण्यात आली आहे. १८ ते २२ जानेवारी १९९४ ला या मैदानावर पहिला क्रिकेट कसोटी सामना ‘भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळविण्यात आला. २७ ऑक्टोबर १९८९ रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना या मैदानावर झाला.
१८ ते २२ जानेवारी १९९४ ला भारत विरुद्ध श्रीलंका हा शेवटचा सामना येथे झाला. तसेच २७ ऑक्टोबर १९८९ ला झालेला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका हा येथील शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर मात्र या मैदानावर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने घेण्यात आलेले नाहीत. मात्र अनेक स्थानिक सामने, इतरही खेळांच्या स्थानिक स्पर्धा या मैदानावर घेतल्या जातात.
Leave a Reply