नवीन लेखन...

अन्न हे पूर्ण ब्रम्ह !

The Food is God

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमात सूत्र संचालकाने सहभागी व्यक्तीला प्रश्न विचारला की तुमच्या होटेल मध्ये इडलीचे किती प्रकार बनविता? उत्तर होते ९९ (नाव्याणव). काही क्षण मलाही प्रश्न पडला की दक्षिणेकडील राज्यात सुद्धा जास्तीत जास्त २० ते ३० प्रकारच्या इडल्या आणि तत्सम इडल्यांपासून बनविण्यात येणारे प्रकार असतील! प्रश्न इडलीचा नाही तर त्याने पुढे जाऊन असे सांगितले की येणाऱ्या काळात आपल्या घरात परंपरागत बनविण्यात येणारे काही पदार्थ काळाच्या पडद्याआड जाणार आहेत! उदा. सर्व प्रकारच्या भाकऱ्या, थालीपीठं, पुरणपोळी, सांज्याच्या पोळ्या, विविध भाज्या, आणि अनेक पदार्थ जे आपल्याला आपल्या आई, आजी, आत्या, मामी, मावशीकडून खायला मिळाले आणि शिकायला मिळाले होते. पण…!!

‘घरकी मुर्गी डाल बराबर’ या म्हणी प्रमाणे आजच्या फास्टफूडच्या जमान्यात घरचं कितीही चवदार असल तरी तरुणाईला ते चांगलं लागत नाही. आणि म्हणूनच बऱ्याच तरुण/तरुणींना घरचे पदार्थसुद्धा माहीत नसतात. त्यात आईची काही चूक नाही. कारण आईने केलेले पदार्थ बाहेरच्या पदार्थासारखे नसतात. म्हणून तर सध्याच्या मुलांच्यात प्रथिने व खनिजांचे प्रमाण कमी असते. माझ्या लहानपणी मला माझी आई मधवेळचे खायला पोह्यांचे विविध प्रकार, थालीपीठे, लाह्यांचे प्रकार, सर्व प्रकारच्या चीक्या असे पदार्थ आवर्जून द्यायची. जेवणात भात, आमटी, पोळी, भाज्या, कोशिंबीरी, लोणचे एखादे डाव्या बाजूला गोडधोड किंवा साजूक तूप-गुळ किंवा केळ्याची शिकरण. अर्थात काही गरीब घरच्या लहान मुलांना यातील बरेच पदार्थ मिळत नसत याची जाणीव आहे. खरचं तेव्हां काही कळत नव्हत पण आता असे वाटते की कुपोषणामुळे शरीराची किती नासाडी होते!

फास्टफूड आणि रस्त्यालगत असलेल्या गाडयांवरील उघडे खाद्यपदार्थ खाण्याने बरेच पालक सर्वत्र अशी ओरड करतात की आमच्या बाब्याचे/बाबीचे वजन खूप वाढत आहे, जरा लठ्ठोबा आणि अंगकाठी बेढब दिसायला लागली आहे. आत्तापासूनच जरा धावले, भरभर जीने चढले की यांना दम लागतो. कसं होणार पुढे काही कळत नाही? हल्लीच्या जमान्यात त्याला ओब्यॅसिटी म्हंटल जात.

सध्याच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनात एकतर जेवण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही किंवा जेवायला (गिळायला) वेळ मिळत नाही. आणि मुख्य म्हणजे किती स्त्री/पुरुषांना जेवण मनापासून बनविण्यात आवड आहे. काही स्त्रियांना वरणभात, आमटी, भाजी, पोळी असे साधे जेवणही करता येत नाही.

जेवण बनविण्यापेक्षा ते किती आत्मीयतेने बनविले आहे त्यात किती प्रेम ओतले आहे. एकवेळ गोड, तिखट, खारट चव कमी असली तरी त्या पदार्थात आपला आत्मा असणे जरुरीचे आहे आणि ज्या व्यक्तीसाठी केले आहे त्यावर असलेले प्रेम, माया यावर त्या पदार्थाचे चांगले/वाईट बनणे/नबनणे अवलंबून असते.

‘थांबला तो संपला’ या म्हणी प्रमाणे प्रत्येकाने स्वत:च्या पायाला भिंगरी लाऊन घेतली आहे. नाहीतर या जगात जगणे कठीण आहे.

असो. सांगायचा मुद्दा हा की भविष्यात वरील कारणास्तव आपणा आपल्या जेवणातील विविध प्रकार आणि तेसुद्धा रुचकर, खनिज आणि प्रथिनयुक्त पोषक आहार गमावून बसणार आहोत. दुकानात किंवा होटेलमध्ये ऑर्डर दिली की सर्व गोष्टी मिळतात असा समज आहे. पण येत्याकाही वर्षात सगळ्याच हॉटेलमधून विविध खाण्याचे प्रकार मिळतीलच असे नाही. भाज्या बनविण्यासाठी आधी भाजी असते कशी? दिसते कशी? भाजीचे नाव काय? कुठे मिळते? कुठल्या हंगामात कुठल्या भाज्या येतात? भाज्यांचे प्रकार किती उदा. फळ भाज्या, पालेभाज्या, शेंगा, आणि त्या कधी खाव्यात? त्या कश्या साफ कराव्यात? भाजी सुखी, ओली का परतून करयाची एक ना अनेक प्रश्न असतात! फोडणी देतांना आधी पातेल्यात फोडणी करून त्यात भाजी टाकायची का पळीत फोडणी करून वरून फोडणी द्यायची? पण स्वयंपाकासाठी एवढी लफडी करण्यापेक्षा ऑर्डर दिलेली बरी किंवा एखाद्या बाईकडून बनवून घेतलेली बरी. पण साहेब आज एखाद्या बाईला स्वयंपाक येत आहे पण काही पिढ्यांच्या नंतर काय? नुसते पुस्तकात वाचून येणार नाही! त्यासाठी मुख्य म्हणजे वेळ, सवय आणि आवड नको का?

या सगळ्यातून कश्याचा आनंद मिळेल तर तो घरचे स्वच्छ, ताजे, चमचमीत आणि स्वस्त दोन घास खायला मिळाले आणि त्यात पैशाची कितीतरी बचत झाली हे फक्त्त तोच जाणू शकतो ज्याने स्वत: घरी करून खाल्ले आहे आणि तोच पदार्थ बाहेरून आणून खाल्ला आहे.

जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..