आम्लपित्त (ACIDITY) हा वरून साधा दिसणारा पण पण गंभीर आजार आहे. थोडी काळजी घ्या आणि आम्लपित्तापासून स्वत:ला वाचवा…
* अवेळी जेवण सकाळचे दुपारी-दुपारचे रात्री उशीरा
* रात्री ९-१० च्या नंतर जेवणारयांना हमखास आम्लपित्त होते.
* सकाळी उठल्याबरोबर चहा घेणारया व्यक्तींना आम्लपित्त असेल तर जगात कोठेही औषधी घेतली तर त्यांचे पित्त कमी होत नाही. म्हणुन आम्लपित्ताच्या रुग्णांनी सकाळी चहा घेऊ नये.
* ज्यांना पोट साफ होत नाही, मलबध्दता असते त्यांना देखील आम्लपित्ताचा त्रास होतो.
* जाहीरातीत बघुन पोट साफ होण्याची औषधी घेतल्यास देखील कित्येकांना आम्लपित्त होते.
* आहारामध्ये सतत पोहे, आंबविलेले पदार्थ जसे इडली-वडा-डोसा- उत्तप्पा खाणारे नागरिक, समोसा, कचोरी, वडापाव, पाणीपुरी-चाईनिज-इतर फास्ट फुड खाणारे, नित्यनियमाने मांसाहार करणारे, तिखट, मसाले, लोणचे, चटण्या, ठेसा खाण्यारयांना आम्लपित्त होते.
* सतत चिंताग्रस्त स्वभाव, रात्री जागरण, अपुरी झोप याने देखील आम्लपित्त होते.
* कौटुंबिक कलह, आर्थिक विवंचना असलेल्या लोकांना देखील आम्लपित्त होते.
* तंबाखु, चहा, कॉफी, सुपारी-गुटखा याच्या अतिप्रमाणातील सेवनाने आम्लपित्त होते.
* सकाळी ९-१० ला जेवण त्यानंतर रात्रीच ८-९-१० ला जेवण करणारयांना देखील आम्लपित्त होते.
* सतत काहीनां काही गोळ्या खात रहाणे यामुळे देखील आम्लपित्त होते.
* अतिकडक उपवास किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने पोटात अॅसिडिटी होते. शिळे अन्न खाल्लय़ाने पोटातले आम्लपित्त वाढते आणि गॅसेस व ढेकर येऊ लागतात.
— सुषमा मोहिते
Sushama Mohote
पोहे खाल्याने पित्त होते का? पोहे खाण्याची योग्य पद्धत कोणती?