आईन्स्टाइन म्हणतो, “आपण ज्या अडचणींना तोंड देतोय, त्या जेव्हा आपण निर्माण केल्या त्याच पातळीवर राहून सुटु शकत नाहीत.
वेगळे परिणाम मिळण्यासाठी गोष्टी वेगळ्या पद्धतीने विभाजीत केल्या गेल्या पाहिजेत. बदलाचे हे मॉडल सात पातळ्यांमध्ये विभाजीत केलेलं आहे – सोप्यापासून कठीणाकडे
पावळी १: परीणामकारता- योग्य गोष्टी करणे.
सर्वात सोपी गोष्टी म्हणजे मूलभुत गोष्टी शिकणे- काम करायला हवं आणि कामात परिणामकारक होण्यासाठी त्वरीत कसा बदल करावा पॅरेटोच्या तत्वानुसार योग्य २० गोष्टी ८० परिणाम देतात. म्हणूनच तुम्ही २० योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं.
पावळी २: कार्यक्षमता-गोष्टी योग्य प्रकारे करणे
यासाठी एखादे काम कशाप्रकारे केले जाते याचे ज्ञान मिळविणे आणि मग त्यावर पुर्ण लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ञाकडून मार्गदर्शन घेणे हा एक उत्तम पर्याय आहे.
पातळी ३: सुधारणा – अधिक चांगल्या प्रकारे करणे
कार्यपद्धतीत असे बदल करणूं की ज्यामुळे तुमच्या कामाचा वेग आणि परिणामकारता दोन्हा वाढेल. त्यासाठी नवनवीन मार्ग वापरून पहायला हवे. नवीन तंत्रज्ञान आणायला हवे. सतत शिकायला हवे.
पातळी ४: अनावश्यक गोष्टी करणं थांबवणे
यासाठी आपल्या कार्यपद्धतीचं विश्लेषण करणं आत्यावश्यक आहे. आपल्या वाढीसाठी आवश्यक अशा गोष्टी शोधून त्यावर लक्ष केंद्रित करून अनावश्यक गोष्टी बाजूला सारल्या पाहीजेत.
पातळी ५: अनुकरण – इतरांच्या परिणामकारक कार्यपद्धतींचे अनुकरण करणे
कोणतीही गोष्ट करताना त्याबद्दलची काही मुलभुत माहीती मिळवून त्यानुसार कामं करणं इतर त्या गोष्टी कशाप्रकारे करत आहेत ते शिकणं आणि त्यापेक्षा चांगलं करणं हेच यशस्वी लोकांच गमक आहे.
पातळी ६: वेगळेपण – इतरांपेक्षा वेगळया गोष्टी करणं किंवा वेगळ्या पद्धतींचा अवलंब करणं
ह्या बद्दल आपलं वेगळंपण सिद्ध करतो. वेगळेपण म्हणजेच प्रगती असं आपल्याला म्हणता येईल. यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नव्या विचार पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. आपल्यातील कल्पनाशक्तीचा पुरेपुर वापर करायला पाहीजे.
पातळी ७: अशक्यप्राय गोष्टी करणे
आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात त्या गोष्टी जर शक्य झाल्या तर किती अमुलाग्र बदल घडून येऊ शकतो याची आपल्याला जाणीव आहे. एकेकाळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याची बरीचशी उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. पण आपण मात्र नवीन गोष्टी, नवीन पद्धतीने करून पाहायला धजत नाहीत कारण आपल्याला अपयशाची भिती वाटते, आणि प्रयत्न केला तरी आपयश आपल्यावर आपण त्याचा पाठपुरावा करायचं सोडून देतो. यशस्वी लोक अपयशामुळे कधीच नमत नाहीत कारण त्यांना त्यांच्या स्वप्नांवर विश्वास असतो. तुम्हीम्ही खात्री बाळगा आणि यशस्वी व्हा.
संकलन – अमोल सातपुते
Leave a Reply