अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली.
श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली होती. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी गुरूप्रतिपदेच्या उत्सवासाठी आपल्या हातातील सुर्यमणी व पादुका त्यांना दिल्या. स्वामींच्या फोटोमध्ये हा सूर्यमणी पहायला मिळतो.
प्रत्यक्ष श्री स्वामींनी दिलेल्या या पादुका व सूर्यमणी अक्कलकोट राजघराण्याने मोठ्या श्रद्धेने आपल्या देवघरात जपून ठेवल्या आहेत.
हा सूर्यमणी आणि पादूका आतापर्यंत राजघराण्याच्या देवालयात नियमितपणे पूजला जातात. मात्र त्यांचे दर्शन सर्वसामान्य नागरिकांना आतापर्यंत उपलब्ध नव्हते.
अक्कलकोटचे विद्यमान राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) संयुक्ताराजे भोसले यांनी हा सूर्यमणी आणि पादुका यांचे सर्व स्वामीभक्तांना दर्शन घेता
यावे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच रविवार, 21 जुलै 2024 रोजी, जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात ठेवण्याचे आयोजन केले आहे. यासाठी राजघराण्याच्या वतीने त्यांनी तमाम स्वामीभक्तांना आमंत्रण दिले आहे.
आता तो सूर्यमणी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.. त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण
गुरुपौर्णिमा, रविवार, दि. २१ जुलै २०२४
श्री गणेश पंचायतन मंदिर, जुना राजवाडा, अक्कलकोट
सकाळी ९ ते रात्री ९ वाजता
अक्कलकोटच्या राजघराण्याने अनुभूती या नावाने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत श्री स्वामी समर्थांची 108 फूटी भव्य मूर्ती, ध्यान केंद्र, मुल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इत्यादिंचा समावेश आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा...
Leave a Reply