नवीन लेखन...

संशोधक बुद्धीचा महान उद्योजक थॉमस अल्वा एडिसन

महान उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी झाला.

थॉमस अल्वा एडिसन म्हटलं की आपल्याला आठवतो त्याचा इलेक्ट्रिक बल्बचा शोध. पण एडिसनच्या नावावर एक-दोन नाही तर तब्बल एक हजार नऊ पेटंट नोंदवली गेली आहेत. सॅम्युअल आणि नॅन्सी दाम्पत्याचं एडिसन हे सातवं अपत्य होतं. लहानपणी आलेल्या तापामुळे एडिसनला बहिरेपण आलेलं. त्यात शेंडेफळ असल्यानं तो आईचा लाडका होता. जेमतेम तीन महिने शाळेत गेलेल्या एडिसनला त्याच्या आईनं घरीच शिकवलं. कुमारवयात एडिसन ट्रेनमध्ये कँडी, वर्तमानपत्र, भाज्या इत्यादी गोष्टी विकून आपला चरितार्थ चालवत असे. त्याच ट्रेनच्या शेवटच्या डब्यात त्यानं आपली केमिकल लॅब तयार केली होती. फावल्या वेळात तो तेथे प्रयोग करत असे. त्या लॅबमध्ये स्फोट होईपर्यंत त्याचे प्रयोग चालू होते. एडिसनने तीन वर्षांच्या जिमी मॅकेन्झी या धावत्या ट्रेनखाली येणाऱ्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल कृतज्ञता म्हणून जिमीच्या वडिलांनी एडिसनला टेलिग्राफ ऑपरेटरचं प्रशिक्षण दिलं.

पुढे टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून नोकरी करताना त्यानं टेलिग्राफवर अनेक प्रयोग करून त्यात सुधारणा केल्या. एडिसनला त्याचं पहिलं पेटंट वयाच्या २३ व्या वर्षी इलेक्ट्रिक वोट रेकॉर्डर मशीनसाठी मिळालं. १८७० साली एडिसननं त्याच्याच आस्थापनेत काम करणाऱ्या अमेरी स्टीलवेल या १६ वर्षांच्या युवतीशी लग्न केलं. त्याच वर्षी एडिसननं संशोधक म्हणून आपला व्यवसाय नेवार्क, न्यूजर्सी येथे चालू केला.

१८७६ साली त्यानं जगातील पहिली इंडस्ट्रियल रिसर्च लॅबोरेटरी मेनलो पार्क, न्यूजर्सी येथे चालू केली. पण त्याला प्रसिद्धी मिळवून दिली ती १८७७ साली लावलेल्या फोनोग्राफच्या शोधाने. एडिसननं म्हटलेली Mary had a little lamb ही पहिली रेकॉर्ड झालेली कविता. वृत्तपत्रांनी या शोधाला वारेमाप प्रसिद्धी दिली.

पुढील काळात एडिसननं अनेक महत्त्वाचे शोध लावले. त्यानं आपलं जीवनच बदलून टाकलं. त्यात किन्टोग्राफ हा मोशन पिक्चर कॅमेरा आणि किन्टोस्कोप हा मोशन पिक्चर दाखवणारा प्रोजेक्टर तयार केला. त्यानं लावलेल्या कार्बन बटनच्या शोधामुळे टेलिफोन तर कार्बन फिलॅमिंटच्या शोधामुळे दीर्घकाळ पेटणाऱ्या इलेक्ट्रिक बल्बचा वापर सुरू झाला.

इलेक्ट्रिकल जनरेटिंग आणि डिस्ट्रिब्युशन सिस्टीमचा शोध लावला. जनरल इलेक्ट्रिक ही कंपनी काढून न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या भागाला विद्युतपुरवठा करायला सुरुवात केली. कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या निकेल आर्यन अल्कलाइन बॅटरीचा शोध लावला तसेच पहिल्या इलेक्ट्रिकल रेल्वेचाही शोध लावला. एडिसनच्या नावावर तब्बल १०९३ पेटंट रजिस्ट्रर झालेली आहेत. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावले व आपले जीवन खरोखरच प्रकाशमान केले.

अमेरिकेतील एडिसन यांच्या घराला भेट देणे हा एक उत्कट अनुभव आहे. न्यूयॉर्कहून दहा मैलांवर अमेरिकेच्या न्यूजर्सी प्रांतातलं वेस्ट ऑरेंज शहर आहे. याच शहरात ‘थॉमस एडिसन नॅशनल हिस्टॉरिकल पार्क’ हे सर्वात मोठं म्युझियम आहे. या म्युझियममध्ये एडिसननं बनवलेल्या चार लाख वस्तू आहेत. त्यात नमुन्या दाखल बनवलेल्या वस्तू, अर्धवट राहिलेले प्रयोग, बाजारात विकण्यासाठी बनवलेल्या वस्तू व या वस्तू बनवण्यासाठी लागणारी फॅक्टरी, प्रयोगशाळा, एडिसनच्या रोजच्या वापरातल्या वस्तू. याशिवाय ४८ हजार ध्वनी मुद्रिका, एडिसनचं दहा हजार दुर्मीळ पुस्तकांचं वाचनालय आणि एडिसनचे ६० हजार फोटो आणि चित्रफिती आहेत. ‘थॉमस एडिसन नॅशनल हिस्टॉरिकल पार्क’मध्ये असलेली एडिसनची लॅब (फॅक्टरी) आणि त्याचं घर अशी दोन ठिकाणं पाहता येतात.

थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन १८ ऑक्टोबर १९३१ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..