ती पण तशीच
तो पण तसाच..
दोघेही विकृतच
म्हणावे लागतील…
त्याने समाजाची,
पैसा मिळावा म्हणून
वाट लावली तर तिने
स्वतःच्या भुकेसाठी…
दोघांच्या भुका घातकच
आज दोघांचे चेहरे
त्यांच्या विकृतीमुळे
संध्याकाळी विझू पाहत आहेत
अजूनही लंगडत लंगडत
तो त्याची विकृती सांभाळून आहे…
त्याला माहित आहे..
आपला शेवट जवळ आहे..
तरी पण विकृतीला चिकटून आहे
त्याची सत्तेची हाव..पैशाची हाव
तशीच आहे…
हे पण स्वतःवरचेच
प्रेम आहे पण विकृतच
असे अनेक तो आणि ती
आपल्याला आपल्याच
आजू-बाजूला
दिसतात तेव्हा जाणवते…
कालाय तस्मे नमः…..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply