खरे तर मी तिला दरोरोज पहातो.
ती कोण आहे हे पण मला माहित आहे .
पण बोलण्याची कधी वेळच आली नाही.
दुकानात सुट्टे पैसे नव्हते .
ती गोंधळली होती.
दुकानदाराने मला सुट्ट्या पैशांबद्दल विचारले.
तसा तिच्याही , मी तिला सुट्टे पैसे दिले.
ती थँक्स म्हणाली.
आम्ही दोघेही दुकानाच्या बाहेर आलो.
ती म्हणाली मी पूर्वीपासून तुम्हाला बघते.
मी पण तेच म्हणालो.
आणि आम्ही दोघेही हसलो.
रस्त्यात भेटली की बोलणे होत असे.
तेच मुलगा यू एस ला होता .
वर्षातून तीन चार महिने ती तेथे जात असे.
घरात सुबत्ता होती..
पण ती एकटीच होती.
बऱ्याच गप्पा होत असत.
खरे तर मला तिची फुल स्टोरी आधीच माहिती होती.
पण प्रत्यक्ष तिची ओळख झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली
ती म्हणजे ती अत्यंत विचारी होती.
तिची स्टोरीच तशी होती.
मूल होत नव्हते.
दोघांना मूल हवे होते.
परंतु पूर्वी टेस्ट ट्यूब बेबी प्रकार नव्हता.
नवऱ्याचा मित्र होता.
दोघांनी ठरवले की त्याच्यापासून
मूल मिळवायचे .
हो ना करता करता ते दोघे तयार झाले.
मूल झाले.
घरात आनंद झाला.
त्याच्या मित्राचे लग्न झाले.
तो दुसऱ्या ठिकाणी पण त्याच शहरात
रहात असे .
परंतु बोलणे काहीच नाही.
तिचा नवरा त्यानंतर अचानक गेला.
ती मुलाकडे गेली.
काही वर्षे राहिली. कंटाळली
परत आली .
सुबत्ता असल्यामुळे सोशल वर्क करत होती..
मला तिचे रहाणे आवडत होते,
पण संभाषण झाले नव्हते कारण मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत होते , वाढत होते
परंतु तिला विचारायला धीर होत नव्हता..
की आपला मुलगा कसा आहे …..!!!!!!!!
सतीश चाफेकर
Leave a Reply