मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते –
‘टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
कशासाठी उभे आहात ?
अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि आम्ही तो रोज मिळवणारच…..
तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
तुम्ही डॉलर मिळवा
लोक बघा किती आनंदात
बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..”
हे फटकारे त्यांनी टिळकांचे नाव घेवून सर्वांवरच ओढले आहेत. या कवितेतले टिळक आपल्या अंगावर धावून येतात आणि आपली झाडाझडती घेतात.
Leave a Reply