४५१ वर्षांत तिसवाडी म्हणजेच इल्हास म्हणजेच १५४३ पर्यंतचे गोवा यामधे काय घडले याबद्दल आपल्याला माहितीच नाही. माहिती नाही म्हणून आपण विचारही करीत नाही. जे सांगितले गेले शिकविले गेले ते समजले, आता आपल चाललय ना व्यवस्थित मग सोडून देऊ अस आपण जगलो. पण आपल्या आक्रमक कर्त्यानी नोंदी लिहून ठेवल्या म्हणून काही गोष्टी आता आपल्याला जाणून घेता येतात. असल्या बऱ्याच नोंदी-गोष्टी नष्ट केल्या गेल्या हे ही जाणून घ्या.
तिमोतीच्या आमंत्रणाने आल्बूकर्कने गोवा ताब्यात १५१० साली घेतला. २३ गलबतात दिड दोन हजार सैनीक असावेत. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या सोळा दिवसात हजारो मुस्लिम पुरूषांची कत्तल केली गेली. आल्बुकेर्कने आपल्या सैन्यांना मुस्लिम बायकांशी विवाह करायला लावले. १५१५ साली आल्बुकेर्क वारला. पुढील २०-२५ वर्षात पोर्तुगिजांची संतती पंधरा वीस हजारांनी वाढली असावी. एका बाईला चार अस ग्रूहीत धरल तर तीन चार हजार बायांना पंचवीस वर्षात पंधरा-वीस हजार संतती झाली असेल.
१५३५ पर्यंत हिंन्दूंना काळ चांगला गेला. पण मग पुढील दहा वर्षे पुर्णपणे जीव मुठीत घेऊन रहाव लागल असेल. सर्व हिंन्दू पागोडे, मठ, मंदीरे तोडा. जे काही हिन्दू रितीरिवाज असतील यांच्यावर पुरण बंदी. मालमत्ता इथच सोडून गोवा सोडून जाण्याचे आदेश निघाले. ३० जून १५४१ रोजी अमलबजावणी सुरू झाली. आदेश पालन न कर्यांच्या कत्तली झाल्या. हि पोर्तुगिजांची नवीन पिढी या कामी आली असावी. कोणी घरात धार्मिक कार्य करतो हा आढळला तर ज्याने माहिती दिली त्याला अर्धी मालमत्ता मिळू लागली, राहिलेला अर्धा चर्च व सरकारला मिळे.
असा अंधाधूंद कारभारत १५६३ मधे जेसुईट क्रिस्थी पंथान पोर्तूगालला कळवल कि इल्हास मधील सर्व ७०,००० धर्मांतरीत झालेले आहेत. हिंदूच एकही धार्मिक स्थळ राहिलेल नाही.
गोवा स्वातंत्र झाला व इल्हास, तिसवाडीत भाविकांनी मंदीरे स्थापन करायला सुरवात केली. आता साठ वर्षानी दोनशेपेक्षा जास्त देवळे तिसवाडीत आहेत. सनातन संस्कृती जी १५४०-५० मधे पुर्ण नष्ट झाली होती ती पुनःजीवीत होऊन परत पुर्णपणे तिसवाडीचा ताबा मिळविणार आहे. आता तिसवाडीत ७०% हिंदू आहेत.
— श्रीकांत बर्वे
Leave a Reply