तो बिनधास होता
त्याला ती आवडायची
का प्रश्न त्या वयात
विचारू नये असे म्हणतात
तो तिच्यावरून आम्हा मित्रांना
जाम पकवयाचा
एक दिवशी त्याला आम्ही
हरभर्याच्या झाडवर चढवला
तो तिला विचारायला गेला
I m interested in you..
तिने उत्तर दिले
No thanks..
तो thank you
म्हणत माघारी आला…
पुढे त्याने सांधा बदलला
तिने पण…..
पण आम्ही नाही विसरलो
त्याचा चेहरा …आणि
तिची मोडकी सायकल..
सांध्यांचे कामच असते
प्रवासासाठी बदलणे…ते
अटळ असते
परंतु एका सांध्यांचे
नाते दुसऱ्या
सांध्याशी असतेच असते….?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply