तू असा वाहता की,खळाळते पाणी,
जसा सागर उचंबळे,
गात जीवनगाणी,–!!!
तू असा निश्चल की,
जसा असतो पहाड,
किती स्थितप्रज्ञ राही,
वाऱ्या वादळी अटल–.!!!
तू असा ढगांसारखा,
अविरत ना चंचल,
संजीवन बरसले तरी,
शांत गंभीर अटळ,–!!!
तू असा किनाऱ्यासम,
भाससी किती तटस्थ,
लाटा सुखदुःखांच्या उफाळती तरीही अतिशय अचल,–!!!
तू असा हिंडता की,
वाऱ्याशी तुझी जोडी,
अखंड वाहशी रातदिनी,
पाय ठहरेना जागी,–!!!
कुठे जाऊन तू पोहोचशी,
तू असा फुलांगत,
जिथे तिथे उमलशी,
वसा आनंदाचा घेऊन,
जागोजागी फैलावशी,–!!!
तू असा वृक्षासारखा,
संसारी अन् संन्यस्त,
इतुके बहरूनही सारखे,
स्वतः मात्र निर्मोही–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply