तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।।
त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।।
पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।।
पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।।
तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।।
गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।।
तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे ‘वर’ मिळोन ।।
कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन हो ।। ४।।
राजा नामें जालंदर । होता तो आसुर ।।
स्वभाव त्याचा क्रूर । गरीब जनांसाठी ।। ५ ।।
तयाची पत्नी सती । त्यास पतिव्रता लाभती ।।
महान तिची पतिभक्ति । वृंदा नाम तिचे ।। ६ ।।
पतिसी मानती देव । अर्पूनी त्याचे चरणीं भाव ।।
पुजिती त्यासी सदैव । मनोभावे ।। ७।।
राजाने देवांना जिंकूनी । बंदी त्यांना करूनी ।।
त्रास सर्वांना देवूनी । हा हा:कार माजविला ।। ८।।
प्रत्यक्ष शिव आला लढण्यास । मारण्या जालंदरास ।।
सोडविण्या देवांचा त्रास । त्याचे कडून ।।९।।
अपूरी पडली शिवशक्ती । मरण त्यास न येती ।।
कोण त्यास वाचविती । प्रश्न पडला शिवे ।।१०।।
ब्रह्म आले सत्वर । पूजा करुन विश्वेश्वर ।।
सुचविती उपाय त्यावर । दैत्यास मारण्याचा ।। ११।।
वृंदा आहे सती महान । पतिवृता शक्ती कठीण ।।
त्या शक्तीमुळे रक्षण । दैत्याचे होई ।।१२।।
तिचा पती धर्म । नष्ट करावा हे मर्म ।।
विष्णूसी सांगावे हे कर्म । करणे करिता ।।१३।।
पतिवृता हरण करणेसाठीं । कारस्थान केले जगतजेठीं ।।
दैत्यनाशा पोटीं । घात केला वृंदेचा ।।१४।।
दैत्य रुप घेवूनी । पती आहे हे भासवूनी ।।
पातिवृत्या नष्ट करोनी । वृंदासी फसविले ।। १५।।
प्रकार आला ध्यानीं । पतिधर्म गेला डागळूनी ।।
खिन्न झाली मनी । सती वृंदा ।। १६।।
शाप दिला संतापूनी । मानव जन्म घेवूनी ।।
पत्नी विरहाचे दु:ख मनीं । सहन करावे लागेल ।। १७।।
विष्णू ‘राम’ अवतरला । आजन्म विरह सोसला ।।
दु:खी, कष्टी आला । सीते साठीं ।। १८ ।।
वृंदेचे जेव्हां पावित्र जाई । रक्षणकवच दूर होई ।।
शिव दैत्यास मारण्या येई । त्याच वेळीं ।। १९।।
दु:खाचा डोंगर कोसळला । पति व पतिधर्म गेला ।।
जगण्यास अर्थ न उरला । वृंदेसाठी ।। २०।।
पति वियोग होतां । सती गेली पतिव्रता ।।
परमेश्वर तिज दर्शन देतां । आशिर्वाद दिला ।।२१।।
परमेश्वरांनी वर दिला । तुलसीचे रूप मिळेल तिला ।।
विष्णुचे सानिध्य लाभण्याला । तिचे भोवतीं ।।२२।।
घरातील अंगण । त्यांत तुलसी वृंदावन ।।
आनंद सुख समाधान । त्या घरी वसे ।।२३।।
पूजा आभिषेकांतील तीर्थ । अर्पूनी जल वृंदावनांत ।।
भाव भक्तीचे मनोरथ । तुलसी ठायी ठेवावे ।। २४।।
सौभाग्यवती ही सति । पतिव्रतेची एक शक्ति ।।
तुळशीच्या आशीर्वादे मिळती । गृहलक्ष्मींना ।।२५।।
तुळसी अंगणीं वसे । संरक्षण वलय असे ।।
दु:ख ना तेथे दिसे । त्या घरामाजीं ।।२६।।
( तुलसी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत )
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
८- २५११८३
Leave a Reply