कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं
देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं….१,
विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें
पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते….२,
देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती
शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती….३,
फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात
दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात….४
अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये
भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनंदे….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply