उखाणा हो नुसते म्हटले तरी लाजायला. होते. हो ना. कुणी शोधले असेल हे. पण आज तागायत उखाणा घेणे आवश्यक आहे लग्न ठरले की घरातील व बाहेरील बायका मैत्रीणी उखाणे शिकवतात. आता हल्ली म्हणे उखाण्याचे पुस्तक मिळते. कोणता उखाणा कधी घ्यायचा हे असते त्यात. आणि यातून बरेच काही शिकायला मिळाले. इतिहास लिहिताना जसे अनेक साधने असतात त्यातून त्या काळाचा संदर्भ मिळतो. पण उखाण्यातून तर अनेक शाखांचे ज्ञान मिळते. नंतर काही काळानंतर पुरुष सुद्धा उखाणा घेऊ लागले. मला नक्की काय म्हणतात ते आठवत नाही पण साधारणपणे आर्या म्हणत असतील. एखाद्या बाईचा आवाज गाण्यासाठी योग्य असेल तर ती गोड आवाजात उखाणा घेत होती हे मी ऐकले आहे….
लग्नाच्यावेळी अनेक प्रसंगात घ्यायचे उखाणे. उदा. देवाच्या मंदिरात दरवळतो उदबत्तीचा वास… घालते जिलेबीचा घास. उदबत्तीचा गुण समजला. पूर्वी लहानपणी लग्न व्हायची म्हणून सगळे काही समजले पाहिजे…
महादेवाला बेल वाहते वाकून… मान राखून..
श्री कृष्णाला वाहते तुळशीचे पान…
मान राखून..
देव व त्यांच्या साठी कोणती फुले पाने वापरायला हवेत हे सांगण्याचा उद्देश होता..
उर्दू भाषेत दगडाला म्हणतात पथ्थर…
लावते अत्तर.
इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून..
यांची सून…
परकिय आक्रमणाचा परिणाम…
स्वराज्य माझ जन्म सिद्ध हक्क आहे असे म्हणतात लोकमान्य टिळक…
नावाने लावते कपाळावर कुंकू ठळक..
इंग्रजानी दिली शिक्षा. सावरकर गेले परदेशी…. च्या दिवशी.
स्वातंत्र्याचे पडसाद..
आई बाबा आहेत प्रेमळ सासूसासरे आहेत हौशी… च्या दिवशी.
नदिवरुन भरुन आणली कळशी.
… चे घर हीच माझी काशी.
मोठ्या माणसांचे स्वभाव व घराला दिलेले आदराचे स्थान..
साठ मिनिटांचा एक होतो तास
राव आहे माझे बी ए पास..
रुप नको पैसा नको पती असावा गुणी.
चे नाव घेते ही नंदिनी.
शिक्षणाचे नव वारे वाहू लागले.
भाजीत भाजी मेथीची…
माझ्या प्रितीची..
तुम्ही मला का आडवला..
माझ्या बायकोचे नाव आहे प्रमिला..
अशीही प्रथा होती…
ग्रामीण भागातील उखाणा दोन वाक्यात नाही तर दोन दोन पानं असतात. पण पाठांतर जबरदस्त. त्यात खोल्यांची नावे. भांडी. घरातील व्यकी आणि काय काय सगळेच विषय हाताळले जात… आता उखाणा वधू वर मनाने तयार करतात. वाहवा मिळवतात. पुढे चालून एकेरी नावाने हाक मारतात पण उखाणा म्हटलं की नक्कीच लाजतात. मी लहानपणी ऐकलेले उखाणे सांगितले आहेत. त्यामुळे यातून समाजाचा इतिहास समजला गेला.
–सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply