आज माणुस शोधून सापडत नाही
सापडला तरी मानवता दिसत नाही
सारं काही कृत्रिमतेनं नटलेले आहे
निर्मल प्रेमभाव कुठे जाणवत नाही
नाती, सुंदर हलक्या फुग्यासारखी
कधी फुटतील त्याची शाश्वती नाही
संस्कार ! फक्त स्वार्थासाठी जगावे
भौतिक जगात नातेच राहिले नाही
कलियुगी हात ओला तर मैतर भला
दातृत्वी भावनां कुठेच उरली नाही
संवाद केवळ आता फक्त व्यवहारी
आत्मीयता, प्रेमभाव नाहीच नाही
जगणे केवळ उलघाल अशाश्वताची
लकेर, तृप्तिची कुठेच दिसत नाही
उर फूटे तो पर्यंत, अहोरात्र धावावे
तरी या युगी कुठेच मन:शांती नाही..
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २१६
२५/८/२०२२
Leave a Reply