अनुत्तरीत असंख्य प्रश्नांनी
पोकळ मनाच्या भरगच्च ज्ञानानी
उतावीळ उतावीळ
मिळालेल्या अनुभवांनी …
संघर्षाची नकोय शक्ती
नाही गाठलेली कुणाची भक्ती
उतावीळ उतावीळ
तरीही येथे प्रत्येक व्यक्ती
विलंबाकडे करुनी पाठ
उद्द्येशाची लावूनी वाट
उतावीळ उतावीळ
त्रिशंकुंचा हा सारीपाट
चाले तंद्री झपाझप
बहिरा असावा जणू प्रत्येक
हेरून संकटांची पोटली
पुन्हा रस्ता त्याच चौकात…
— सौ. देवयानी खरे
Leave a Reply