(वसंत आणि त्याची पत्नी अरुणा यांच्या मधला…वसंताच्या मनातले)
पुष्कळदा अस्वस्थ वाटत असलं म्हणजे कुणी तरी अगदी जवळ नुसतं बसावं ,
किंवा कुणाच्या तरी कुशीत शिरावं हीच माणसाला ओढ असते,हि …इच्छा पुरी होत नाही .
तिथंही मन मारावं लागतं.अधूनमधून मला हा आधार लागतो.
ह्याची अरुणाला जाणीव आहे. पण आठच दिवसांपूर्वी सहज बोलता बोलता ती शेजारच्या बाईंना म्हणाली,“कुठं निवांतपणी जावं , राहावं असं एकही घर नाही .” — माझ्या कानावर हे वाक्य पडलं आणि वाटून गेलं, आपण सगळी सुबत्ता असूनही ‘पोरके’ आहोत.
आणि ह्याच वेळेला दुसरी जाणीव झाली कि, आपल्या एवढीच अरुणा पोरकी आहे . माझ्या व्यथेमध्ये सहभागी होणारा कुणी नाही, म्हणून मी जेवढा कष्टी आहे तेवढीच अरुनाही कष्टी आहे, आणि पोरकेपणा म्हणजे तरी नक्की काय हो ? आपली व्यथा इतरांना न समजने हाच पोरकेपणा.
आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामुली वाटतात.
हेच एकटेपण, पोरकेपण, केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. जीवनात असंच असतं, असं म्हणतो .
स्वतःची समजूत स्वत: घालतो , पण कुठेतरी ठिणगी पेटते आणि मग सगळं खाक होतं.
असा हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडतं. कारण ज्याला आच आहे, जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस आहे.
पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही, ह्याचं कारण मागं काही उरत नाही .
तसं जळणं नको. राखेच्या रुपात का होईना- मागं काही तरी राहायला हवं.
कारण राखेतून काही तरी निर्माण होण्याची आशा असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply