नवीन लेखन...

वर्‍हाडाची तर्‍हाच न्यारी….

लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन,  रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ वाजवणे, घोडा नाचवणे, नवरदेवासमोर नाचणे, फोटो, व्हीडीओ शुटिंग हे आता नविन आलेले प्रकार. तीसेक वर्षापुर्वीचे लग्नपध्दती वेगळी होती.साधी पत्रिका. तांदूळ वाटपाने निमंत्रण. जांभळाच्या पाल्याचा मांडव दारी. लाप्सी,भात आणि कढी हा मेनू. बैलगाडीने वर्हाड लग्नाला जाणार.नव्या पाहुण्याच्या गंजीच्या  पेंढ्या उपसणार. बैल फुगूस्तर मागं बघायचं नाही. मग मानपान आलाच. वरमायचा थाट. घागर आडवी येणार.टाॅवेल-टोपी.भेटीगाठी. आदरयुक्त बोलणे. थट्टामस्करी. चावडीत उतरणे. तेव्हाच्या बेसन , पिठले भाकरीची चव आजही जिभेवर रूळलेली. सगळा गाव यायचा. झटू लागायला. स्वयंपाक, झाडलोट सगळे एकत्रच. रात्रीच्या लग्नाची शोभा काही औरच असे.लाऊडस्पिकरची ताटली वाजे.त्यावर एक माॅनिटर ठेवत. अस्सल रांगड मराठी गाणं वाजायचं. दादाच्या गाण्याला , लावणीला विशेष पसंती.पाहुण्याच्या परिस्थितीनुसार लग्न होत. रेडीयो, सायकल, घड्याळ ही मोठी भेटवस्तू.लग्नामध्ये नवरदेवाने रूसणे फुगणे आलेच.

काळ बदलत गेला. लग्नाची पध्दती बदलली. व्यवहार बदलले.ट्रकने , टेम्पोने वर्हाड जाऊ लागले. यात मुलांचा उत्साह शिगेला पोहोचतो. नवे कपडे. एकमेकांशी मस्करी. समवयस्कांचा समूह. आनंद घेणे हे वर्हाडाचे काम.’ नवरदेव जातो नवरीसाठी आणि वर्हाड जात खाण्यासाठी’ ही अलिखीत पण रूढ म्हण. वर्हाडाच्या अनेक तर्हा. पोरांना ट्रकच्या टपावर ठरलेली जागा.काही ट्रकचे ड्रायव्हर चांगले तर काही खडूस. टपावर बसलं की सगळ्या जगाचे आपणच राजे असा आभास. आपणच ट्रक चालवतो असच वाटायचं. खाली बघ.वर बघ.मोघम आरडा असायचा. झाड आली की कुठलीही पर्वा करायची नाही. पाला तोडायचा . कडूनिंबाच्या निंबोळ्या तोडायच्या.मनसोक्त एकमेकांना मारायच्या.ट्रकमध्ये बसलेल्या मोठ्या माणसालासुद्धा सोडायचे नाही. मस्करी करायची.आनंद घ्यायचा.कुणी ओरडायचं.उखाळ्यांसह गावातलं इत्यंभूत वर्णन आलच.पाऊस असेल तर तिथच ताडपत्री अंगावर.कोणते वर्हाड कुठे हाणलं.हा चवीनं चर्चेचा विषय. लग्नात आलेला रूखवत वाटातच खाऊन टाकायचा.कुरडया फेकून मारायच्या.मजा असायची. मन मोकळ असायच.आता शहरातल्या गर्दीत हरवलेला माणूस पाहिला की हे आनंदाचे क्षण आठवतात.

— विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..