मराठीसृष्टीच्या वाचकांना, या अद्भुत रसायनाची माहिती देताना मनापासून आनंद होत आहे.
`या नगराला लागुनिया,
सुंदर ती दुसरी दुनिया,
या बालांनो या रे या’
हे जसं कवी लहान मुलांना बोलावून.. एका आनंद देणाऱ्या… लागूनच असलेल्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी आवाहन करतो… तद्वतच !
लहान मुलांना ज्याप्रमाणे निरागस-निखळ आणि अकृत्रिम असा `आनंद’… ज्याला विरुद्धार्थी शब्द नाही असा तो… म्हणजे कसा की `सुख’ ला विरुद्धार्थी शब्द `दुःख’ आहे. तसा `आनंद’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाहीये…! पुढे पुढेच जावं लागतं….! आनंद – आत्मानंद – परमानंद – परमोच्च आनंद – ब्रह्मानंद….
ही अनुभूती फक्त आपल्या स्वतःलाच मिळवता येते. उद्योगपतींना मिळणारे समाधान आपल्याला अनुभवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला `उद्योगपती’ पर्यंत जावे लागेल, पोहोचावे लागेल, नव्हे नव्हे…. आपल्याला उद्योगपतीच बनावं लागेल… तेव्हा तो अनुभव अन ते समाधान काय असतं, ते समाधान कसं असतं, याचा आनंद लुटता येईल.
जो गोड खातो त्याला त्या पदार्थांची गोडी, त्या पदार्थाची चव चाखता येते. इतर दुसऱ्या व्यक्तीला `ज्याने’ ती गोड चव चाखलेली असते, त्याचा अनुभव घेता येत नाही. त्याला तसेच `अगोड’ चेहऱ्याने बसावे लागते. हे सारं कथन करण्याचा अट्टाहास एवढ्याचसाठी की आपण याच `मराठीसृष्टी’च्या एका अंगणात माझा `रंगचिकित्सा’ या विषयावरील `ज्ञानप्रयोग’ वाचा, व वाचला असेल तर… त्या विषयाच्या लेखांक एक मध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये `चिंतेचे विषय’ अर्थातच चिंताग्रस्तच्या बाबतीत मी बोलतोय… खूप आहेत. ज्यांवर रंगचिकित्सा उपचारक – उपकारक ठरू शकते. त्याच पद्धतीने मात्र `हार्डवेअर’ स्वरूपात मी आपणास वास्तुशास्त्र पेंटिंग या प्रकारावर माहिती देणार आहे.
अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो !
आपल्या वास्तूत, आपल्या कंपनीत, आपल्या व्यवसायाच्या जागेत, आपल्या इंडस्ट्रीत, आपल्या धार्मिक स्थळी देखील… आपण `वास्तुशास्त्र पेंटिंग’ ठेवू शकतो… त्याचे फायदे अनेक आहेत अन ज्ञात-अज्ञात, सुप्त त्रास विरून अस्तित्वात `मर्ज’ करण्याची क्षमता आहे.
या प्रस्तावनेत आपण `वास्तुशास्त्र पेंटिंग’ हा शब्दच ऐकलात… पुढे अजून बरेच काही आहे… पुढील लेखात…
— प्रा. गजानन सिताराम शेपाळ
Leave a Reply