तो .. असेल २८-३० च्या आसपास ..
ती …. साधारण २५-२६ वर्षांची..
रोज सकाळी दोघेही “योग साधना” वर्गाला जायचे ..
आधी फक्त लांबून… “ईशारों ईशारोंमे” ..
मग हळू हळू ओळख झाली ..
वर्ग संपल्यावर गप्पा होऊ लागल्या..
क्वचित टपरीवर चहा सुद्धा..
आवडायला लागले एकमेकांना..
हळूहळू त्या गप्पांचा कालावधी वाढला..
आवडी निवडी , विचार याचा अंदाज येऊ लागला..
दोघांचही अजून लग्न झालेलं नाही हे एव्हाना लक्षात आलं ..
ते पथ्यावरच पडलं ..
आता वाहत्या प्रेमासाठी धरण बांधायची गरज नव्हती ..
आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय हे दोघांनाही समजलं होतं ..
अगदी न व्यक्त करताही..
पण काहीतरी होतं ss जे त्यांच्या मनाला मागे खेचत होतं..
कदाचित .. तिला वाटत असेल ,
इतर लग्नाळू मुलींच्या मानानी आपलं वय जास्त .. तो किती तरुण
त्यालाही वाटत असेल कदाचित .. अगदी असंच ..
आपण मोठे …. ती किती लहान ..
पण ही द्विधा मनस्थिती नकोच ..
आज सोक्षमोक्ष लावायचाच..
ठरवून दोघं कॉफी प्यायला गेले ..
मोठ्याश्या कॉफी शॉप मध्ये ..
त्यानी “प्यार का इजहार” वगैरे तर केला..
पण पुढे म्हणाला ..
“मी तुझ्यासाठी सुटेबल आहे असं वाटत नाही मला !!” ..
तिने सुद्धा प्रेमाची कबुली दिली पण पुढे तेच..
“मलासुद्धा मी तुझ्यासाठी मॅच वाटत नाही रे !!”..
पण असं का ?? ते कोणीच सांगत नव्हतं..
त्या नादात कॉफी संपली..
वेटरनी त्याच्याकडे बिल दिलं ..
तिच्याकडे रेस्टॉरंटचा फीडबॅक फॉर्म दिला..
त्यानी बिल द्यायला पाकीट काढलं..
ती फॉर्म भरायला लागली..
लिहिता लिहिता त्यात वयाचा कॉलम आला..
ती पटकन लिहून गेली.. .. “४५”
हा डोळे मोठे करून बघतोय..
ती सुद्धा जरा थबकली..
“अरे ss … हेच कारण होतं माझं !!”
“मला छान दिसायला , फीट रहायला आवडतं !!”
“म्हणून वयानी लहान दिसते मी फक्त !!”
“तू इतका तरुण हँडसम .. किती अंतर आपल्यात !!”
“म्हणून थोडी भीड वाटत होती मला !!”
तो एकदम शांत
अचानक फिदीफिदी हसायलाच लागला ..
“काय झालं रे हसायला .. माझ्यावर हसतोयस ना ??”..
त्यांनी उघडलेल्या पाकीटातून त्याचं आधार कार्ड काढलं..
“बघ यावरची जन्मतारीख .. काढ माझं वय !!”
तिनी लगेच गणित केलं..
आणि एकदम ओरडलीच … “४८ ??? “
“बघ !! म्हणून मी तुला लग्नाचं विचारायला घाबरत होतो !!”
“तू किती लहान आणि मी म्हातारा असं वाटायचं मला !!”
“पण आता काहीच प्रॉब्लेम नाही ..!!”
“काही क्षणात आपलं वय वाढलं पण आपल्यातलं “अंतर तेवढंच राहिलं” !!”
पुन्हा नव्याने कॉफीची ऑर्डर दिली..
नंतर दोघं हातात हात घेऊन बाहेर पडले…
सोबत होतं न दिसणारं , न वाढलेलं वय …
दोघांचा अनेक वर्ष रखडलेला लग्नाचा “योग” जुळून आला…
हे शक्य झालं “योग” केल्यामुळे…
तरुणांना लाजवेल अशी चिरतरुण प्रेम कहाणी…
आपल्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायचंय ??
कुठल्याही वयात असताना योग्य जोडीदार मिळवायचाय ?? ..
नियमित “योग” करा , फीट रहा…
“योग” केल्याचा असाही एक फायदा…
“वय” इथले संपत नाही…
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply