बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित.
मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये एक गाणे पडयावर गाणे तर केव्हा एखादा फाईटसीन. पण घरी चोरून व्ही सी आर आणण्यापर्यंत जो काही प्रवास असे तो जीवघेणा असे आणि मग पूढे ते सम्पूर्ण बघता आले की श्रमाचे चीज का लोणी होत असे.
मला आठवतंय आमच्याइथे भाड्याने व्हीसीआर मिळत परंतु ते एक घरातून मिळत , कधीकधी कुणी कॅसेट आणायला जात असे तेव्हा त्यांची मोठी मुलगी बघितल्यावर क्सासेट मागणारा अडखळत असे मग तीच सांगत असे वो कासेत चाहिये ना, आयसा बोलो ना आणि खुद्कन हसून ती कॅसेट देत असे मागणारा झक मारली आणि मागितली असे त्याला होत असे.
विशेषतः A सर्टिफिकेटची सिनेमा त्यावेळी लागत से अर्थात इंग्रजी , पोस्टर भडक दिसले की कार्टी थेटरात पण कधीकधी तो पोस्टर शॉट कट केलेला असे मग सगळे चडफडत.
तेव्हा आम्ही एक काटेकावरपणे नियम पाळत असू ते म्हणजे टॉकीजच्या बाहेर आल्या आल्या तिकीट फेकून देणे. पण काही मुलाचे तीर्थरूप पक्के चालू म्हणा अनुभवी म्हणा शर्टाच्या मागे पडलेल्या चुण्यावरून ओळखत असत ह्याने आज पिक्चर टाकलेला आहे.
सगळे कमावते झाले , बिझी झाले. खूप काळ गेला स्मार्ट फोन आला, तरीपण ब्ल्यू फिल्म डोक्यातच होत्या..
मला आठवतंय माझ्या ठाण्याच्या बिल्डींग मध्ये खाली दुकाने आहेत तेथे एका ब्रँडेड चष्म्याच्या दुकानाचे ओपनींग होणार होते त्यावेळी ते करायला सनी लिओन येणार होती. खाली गर्दी होती रात्री दहा वाजता ती आली मी गॅलरीतून बघितले ती दुकानात जाताना दिसली , माझे नव्वद वर्धाचे वडील पण होते, ते म्हणाले ही कोण आहे ? मी चुपचाप कॉम्प्युटर वर बसलो , सर्च मारला वडिलांना सांगितले ही ती बया ..वडील हैराण ..चूप.
त्यावेळी इतक्या वर्षानंतर पोर्नचे दर्शन झाले. पहिल्यांदा पोर्नचे दर्शन झाले. मग मोबाईल वर सुरु. पण फारच थोडा काळ कारण त्याचे बिझनेसचे स्वरूप समजले आणि परदेशात तर सहजपणे हा व्यवसाय चालतो.
आपल्या देशात त्या बाबतीत आपण मागासलेले आहोत अर्थात मनातून नाही ? वृत्ती आणि विकृती यांच्यामध्ये एक गोल्डन लाईन असते ती कधी पार पडतो आणि कधी नाही हे समाजातच नाही. जेव्हा crime सिरीज बघतो तेव्हा त्याचे भयानक स्वरुप दिसते. कायद्याने त्याला बंदी आहे म्हणे तर करा लॉक सगळे. आज तर ते इतके सहज आहे. पण ते का होत नाही ? याचे एकाच कारण जितका खोकला दाबून धराल तितकी उबळ जास्त.
साधे उदाहरण घेऊ चार ताटे झाकली आहेत , मग तीन ताटावरचे रुमाल काढले. पण एक ताटावर रुमाल तसाच ठेवला , तर सगळे लक्ष केंद्रित होते ते झाकलेल्या ताटावर ?
हे सगळे त्या बालक पालक चा फोटो बघितला आणि आठवले.
बघा विचार करा, आत्मपरीक्षण करा काहीही करा…पण प्रामाणिकपणे?
सतीश चाफेकर
Leave a Reply