भेट तिची माझी थेट नभ-धराची
सुख क्षण भराचे आस जीवनाची
भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी
आठवांचा ताटवा,असे सदा सोबती
सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची
कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना
कोण घेईल समजून,माझ्या यातना
माणसाचे जग की,दुनिया पत्थराची
जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव
कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज
कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची
भावना अनावर होती,सांज सकाळी
बावऱ्या मनाला, नच सुचे काही
जीवघेणी भासे, ती वेदना विरहाचि
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.
Leave a Reply