आज सकाळी कामावर जाण्यासाठी निघालो पण नेहमीप्रमाने रोजचा रस्ता पावसामुळे बंध झाल्याने कोंगनोळी पांडेगाव खिळेगाव असा निघालो,सकाळी थोडा हलकासा पाउस पण पडत होता. कोंगनोळी च्या पुढे गेल्यावर कच्चा रस्ता लागतो मी तसाच पुढेजात होतो तेव्हा पुढे तीन शाळेची मुले शाळेला जाताना दिसली, रस्ता तर खुपच ओबडधोबड खड्ड्यांचा आहे त्या वर गाडी चालवायचं काय तर सरळ चालायचं मुश्कील आशा रस्त्यात ती तीन मुले जात होती दोघांनी चप्पल घातलेली व त्यातील एकट्या कडे चप्पल न्हवती तो मुलगा अनवाणी होता पाय चिखलाने भरले होते दोघे जण भरभर पुढे जात होते तो मात्र पायातील दगड व काटे चुकवत त्यांच्या पाठीमागून जात होता ते सर्व मी त्यांच्या पाठीमागे असल्या मूळे पाहत होतो. पांडेगाव किमान २ ते ३ किमी असावं तोपर्यंत मी त्यांच्या जवळ पोहचलो आणी त्या तीघांना विचारले की येणार का माझ्या गाडीवरून ती मुलं होय म्हणून जवळ आली मग मी त्या तिघांना माझ्या गाडीवर घेऊन निघालो.
जात असताना मी त्यांच्याशी थोडा संवाद साधला की कुठे चालला आहे, कोणत्या शाळेत वैगेरे, नंतर मग मी त्या अणवानी असणार्या मुलाला विचारले तु कुठल्या शाळेत आहेस, तो म्हणाला खिळेगावच्या शाळेत आहे, चौथी च्या वर्गात शिकायला आहे, रोज चालत येतो जातो, मग विचारले तूझी चप्पल कुठे आहे तर म्हणाला मागच्या आठवड्यात पाउस पडला होता चिखलातून येताना तुटली, मी म्हणालो “मग नविन घ्यायची ” तर तो मुलगा म्हणाला “आजून पाउस पडतूया चिकूल पण लय झालाय आमच्या वाटला, नविन चप्पल परत तूटल म्हणून मीच नगो म्हटलो पाउस थांबल्यावर घेतो उगच पैसं पाण्यात जायाचं” हे त्याचे वाक्यं ऐकून मन सुन्न झाले, आत्ताच्या पिढीत हे विचार ते पन दहा वर्षांच्या मुलाकडून. नाहीतर आज ९९ % पालक व मुलं त्यांना त्यांच्या सर्व गरजा त्यांच्या पसंतीच्या दिल्याशिवाय शाळेत जात नाहीत. मग मी त्याला त्याचे नाव विचारले त्याने नाव सांगितले अशोक.
आज अशोक मुळे मला माझे बालपण काही क्षण डोळ्यासमोर उभं राहिलं, आणि ग्रामीण व शहरी भागातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थां मधील वैचारिक तफावत पण पाहीली.
कुठे तो अशोक आणि कुठे ती मुलं ज्यांचे पालक त्यांच्या गरजा, हट्ट मागायच्या आधीच पुरवले जातात. ऐकीकडे आज शाळांसाठी द्यावी लागणारी भरमसाठ फी देउन मुलांना शाळेत घातल जातं, ऐकीकडे मुलांना शाळेत पोहचण्या साठी कसरत करावी लागते.
— सुखदेव पाटील
patil.sukhadev56@gmail.com
Leave a Reply