विश्वामध्ये वावरतां भोंवती विश्व पसारा
रमतो गमतो खेळतो जीवन घालवी सारा,
संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित
प्रत्येक ती निर्माण करी आपलेच विश्व त्यांत
जीव निर्जीव विखूरल्या वस्तू अनेक
आगळ्या त्या परि ठरे एकाचीच घटक,
विश्वामध्येच विश्व असते राहून बघे विश्वांत
समरस होता त्याच विश्वाशी प्रभूमय सारे होत
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply