आता सरु लागले आयुष्य हे सारे
तरीही तुझे मौन मात्र संपले नाही…
कसला हा असा दैवयोग भाळीचा
हे गूढ तुझे अजूनही कळले नाही…
शब्द तुझे अजूनही कां? अव्यक्त
हेच मजला अजूनही उमगले नाही…
नव्हते कधीच काहीच मागणे माझे
तुजवीण जगणे कधीच रुचले नाही…
श्वासासंगे, तुजवरी प्रेम करीत आहे
तुला कधीच विसरूही शकलो नाही…
तूही हे सारे, सारेच जाणतेस तरीही
तुझे व्रत मौनाचे आजही संपले नाही…
प्रीतिवीना कां? कधी जग हे जगते
हे सत्य, कधीच असत्य ठरले नाही…
रचना क्र.५४
२२/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply