माझ्या व्याख्याच वेगळ्या आहेत ‘श्रीमंती’ च्या.
.
.
बघा, पटतात का तुम्हाला !
.
.
घरात दररोज ताजी फळं/फुलं/भरपूर दूध/दही असणं म्हणजे… ‘श्रीमंती’.
.
.
.
आज अवचित पाहुणा दारात आला आणि मी त्याला पोटभर जेवू घालू शकलो तर,
…मी ‘श्रीमंत’ आहे.
.
.
माझी सहज आठवण आली म्हणून एखाद्या मित्राचा, नातेवाईकाचा फोन आला तर,
…मी ‘श्रीमंत’ आहे.
.
.
कुणीतरी अडचणीत आहे,
मदतीसाठी माझी आठवण आली तर,
…मी नक्कीच ‘श्रीमंत’ .
.
.
कुणाचे तरी विश्वासपात्र असणे म्हणजे… ‘श्रीमंती’ .
.
.
भर उन्हात फुललेला गुलमोहोर/फुललेली झाडे दिसावी म्हणजे… …नजरेची ‘श्रीमंती’.
.
.
.
थंडीत मस्त फुले अंगणभर पडावीत तर कधी पारिजातकाचा सडा, सोनचाफ्यांची फुले पडावी आणि त्यांच्या सुगंधानें सबंध अंगण भरून जावं ही ‘श्रीमंती’.
.
.
थंडीच्या गारठ्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुक्यात फुलांचा सुगंध तृप्त, मदमस्त करून जावा,
…हीच ‘श्रीमंती’.
.
.
.
होय. मला अशीच ‘श्रीमंती’ हवी आहे.
.
.
.
अशी ‘श्रीमंती’ आपल्या सर्वांनाही लाभावी.
.
.
.
असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात यावेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आनंदाने जगता यावेत .
.
.
.
आपल्या आसपास भरपूर माणसं असावीत आणि आपण खरंच या अर्थाने ‘श्रीमंत’ व्हावे.
.
.
.
‘श्रीमंती’ म्हणजे समाधान.
…समाधानात ‘श्रीमंती’.
— विलास सातपुते.
9766544908
Leave a Reply