गरिबाची लुट
श्रीमंताला सुट
अन्यायाची धामधुम खुप झाली .
आता माझी सटकली….
धान गेला; कापुस गेला
सोयाबिननेही दगा दिला
कवडीमोल मदतीचा
माञ झाला गलबला.
वागण्याची रित ही खुप झाली.
आता माझी सटकली………..
निर्यातीला नाही वाव
देशी मालाचे पाडले भाव
कर्जाच्या डोंगराखाली
दाबला सारा गाव.
दुजाभावाची रित ही जुनी झाली.
आता माझी सटकली ………….
“निती” ला उभं करून
विचाराचं मंथन झालं
ग्रहणालाही लाजवेल
असं “अधिग्रहण ” झालं
आता पून्हा काही राहिलं का बाकी
कुठं नेऊन ठेवली माझ्या महाराष्ट्राची झाकी.
* कवी प्रभाकर कुबडे ११/४/१५ नागपुर