|| हरी ॐ ||
मोनोरेल मनातल्या मनात विचार करू लागली,
कोण धावून आले प्रथम प्रवाश्यांच्या मदतीला?
२२ एप्रिल, १८५३ला मुंबई-ठाणे
रेल्वे धावली प्रवाश्यांच्या मदतीला !
अजून एक आठवण राहूनच गेली,
७ मे १९०७ रोजी
ट्रामगाडी आणि
कोलकतामध्ये मेट्रोरेल्वे आली
प्रवाश्यांच्या मदतीला !
मानवांचे बरे आहे
नऊ महिने नऊ दिवसांनी
मुले येती जन्माला !
परंतु ८८ वर्षे लागली मला जन्मायला !
का कोणास ठाऊक
कुटुंबनियोजन मात्र आमच्या नशिबाला !
माझा प्रवास कधी एका रुळावरून,
कधी जमिनीखालून, उंचावरून,
तर कधी लटकून !
एक मात्र मला आता भीती नाही,
कोणीही मला मांजरी सारखे,
आडवे जाणार नाही,
माणसांना मृत्यू कवटाळणार नाहीत
म्हणून मला कोणी नावे ठेवणार नाहीत !
माझ्याच प्रोजेक्टमध्ये कशी शिंकते माशी?
पडतात पैसे कमी,
लाल फितीत अडकते कशी?
गुलाबी, निळा आणि पोपटी
रंगांच्या सड्यात मी ठुमकत धावते कशी?
जरी आत्ता वेग आणि फेर्या कमी,
तरी गारेगार प्रवासाची लज्जत वाटते कशी?
जगदीश पटवर्धन,बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply