आम्ही तर बा शहरात राहतो. फ्लेट मध्ये किंवा दिल्लीत सारखे १५x ६० च्या घरात. पाण्याचे प्रदूषण कमी करण्यात आम्ही काहीच योगदान देऊ शकत नाही. अशी बहुतेकांची धारणा असते. आपण पाणी वापरतोच. तोंड धुवण्यासाठी, संडासात, आंघोळीसाठी, भांडे घासण्यासाठी, कपडे धुवण्यासाठी, घराला पोंछा मारण्यासाठी, संडास स्वच्छ कार्ण्यासाठी. हेच पाणी नाल्यातून जमिनीत झिरपत-झिरपत नदीमध्ये जाते आणि जमीनीच्या खालच्या पाण्याला व नदीला प्रदूषित करते. कारखान्या व्यतिरिक्त दिल्लीचे २.५ कोटी लोक किमान ६०० कोटी lलिटर पाणी रोज प्रदूषित करतात. बाकी शहरात हि हेच गणित असेल. हे प्रदूषण कमी करणे आपल्या हातात आहे.
तुम्ही म्हणाल. पटाईतजी उपदेश कुणीही देऊ शकतो, तुम्ही या साठी काय केले. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपण कुणाला उपदेश करू नये. मी बाह्य दिल्लीत बिंदापूर येथे राहतो, इथे पाण्याची कमतरता नेहमीचीच. कमी पाण्याचा योग्य वापर करण्याची कला हि शिकावीच लागली. पाणी आपण दोन रीतीने प्रदूषित करतो, एक प्राकृतिक पदार्थांचे प्रदूषण आणि दुसरे रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाण्यात जातात. प्राकृतिक पदार्थांचे प्रदूषण दूर करण्याची शक्ती पाण्यात नेसर्गिक रूपेण आहे,पण रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाणी दूर करू शकत नाही.
सकाळी उठल्यावर आपण तोंड धुवतो. बाजारात रसायनिक पदार्थ असलेले टूथपेस्ट आणि नेसर्गिक पदार्थ असलेले टूथपेस्ट मिळतात. सर्व नेसर्गिक पदार्थांच्या पेकेजिंग वर हिरवे निशाण असते. मजेदार अधिकांश भारतीय कंपन्या डाबर, विको आणि पतंजलीचे इत्यादींचे टूथपेस्ट प्राकृतिक पदार्थांपासून बनलेले आहे. मी यातली एक वापरणे सुरु केले आहे.
आंघोळीसाठी साबण, शेम्पू इत्यादी हि हिरवे निशाण असलेले वापरले पाहिजे. पतंजलीचे सर्व साबण आणि शेम्पू फेसवाश, क्रीम एवढेच काय दाढीसाठी क्रीम हि हिरव्या निशाण वाली आहे. हिमालय, डाबर व अनेक भारतीय कंपन्या प्राकृतिक पदार्थांपासून वस्तू बनवितात. आजकाल मी तेच वापरतो.
आंघोळ करताना पाण्याची बचत हि केली पाहिजे. मी सामान्यत: ५ लिटर पाण्यात आंघोळ पूर्ण करतो. एक मग (६०० ml) पाणी घेऊन सर्वांगाला साबून आणि डोक्याला शेम्पू लावतो. नंतर दोन मग पाणी हळू हळू डोक्यावर टाकून डोके स्वच्छ करतो. दोन मग पाण्याने बाकी शरीर हि. शेवटी २ मग पाणी अंगावर टाकून आंघोळ पूर्ण करतो. प्रयत्न करून बघा. ५ नाही तर १० लिटरच्या आत आंघोळ करणे निश्चित जमेल.
घरीझाडू पोंछा लावण्यासाठी बाई येते. पूर्वी रासायनिक Sनाईल वापरायचो. पोंछा लावल्या नंतर, जमीन सुकल्यावर, सुष्म रासायनिक पदार्थ नाकाच्या वाटे शरीरात जाणारच. शरीर हि रोगी होणार व शिवाय पाणी हि प्रदूषित. मी गेल्या दोन वर्षांपासून गौमूत्र, कडूलिंब, युकेलिप्टसच्या तेल असलेले,गोनाइल वापरणे सुरु केले आहे. स्थानीय गौशाला, खादी ग्रामोद्योग व पतंजली गौनाईल विकतात. घर स्वच्छ, शरीराला अपाय हि नाही आणि प्रदूषण हि कमी. तसेच अधिकांश लोक अज्ञानवश संडास स्वच्छ करण्यासाठी रासायनिक पदार्थ असलेले टोईलेट क्लीनर वापरतात. या मुळे पाणी भयंकर रित्या प्रदूषित होते. त्या जागी मी प्राकृतिक पदार्थांनी बनलेले टोईलेट क्लीनर वापरायला सुरुवात केली. आपले दुर्भाग्य सध्या तरी माझ्या माहिती प्रमाणे फक्त एकच स्वदेशी कंपनी नेसर्गिक टोईलेट क्लीनर बनविते आहे. मी तेच वापरतो.
भांडे घासण्यासाठी पूर्वी राख वापरली जायची. आता गॅसवर स्वैपाक बनतो. आपण भांडे घासण्यासाठी हि शक्तिशाली रसायन युक्त भांडे घासायचे साबण किंवा लिक़्विड वापरतो. भांडे वाळल्या वर व्यवस्थित पाहिल्यास काही पांढरे निशाण भांड्यांवर दिसतील. हे रासायनिक पदार्थ जेवताना आपल्या शरीरात हि जातात. शरीर रोगी होणार हे १०० टक्के. राख शरीरात गेली तरी काही नुकसान होत नाही. आज बाजारात राखेपासून (राख + लिंबू) बनलेले भांडे घासायचे एका स्वदेशी कंपनीचे साबण मिळते. मी तेच वापरणे सुरु केले आहे. बहुतेक काही काळात अनेक कंपन्या हि बाजारात येतील. भारतीयच.
आमची सौ. नेहमीच संध्याकाळी ५ वाजतानंतर कपडे धुवते. त्या वेळी टाकीचे पाणी गरम असते. साबण (पावडर) हि कमी लागते. वाशिंग माशिनीत कपडे फिरविल्यानंतर कपडे व्यवस्थित पिळून ड्रायर मध्ये टाकते. पाण्याची ६० ते ७० टक्के बचत होते. शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होते.
सारांश एवढाच.आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो. हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे.
टीप: जर ३० कोटी लोक हि गौनाईल वापरू लागले, अर्थात रोज १ कोटी लिटर गौनाईल. तर घर तर स्वच्छ होईल, शिवाय शेतकर्यांची आमदनी हि वाढेल. गौमूत्र रु लिटर भावाने एक कंपनी विकत घेते. उतरखंड येथील शेकडो शेतकर्यांना आज फायदा मिळतो आहे. शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होणार.