गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरींनी म्हटलं आहे. सध्या आपण बर्याच खटल्यांच्या संदर्भात अमॅकस क्युरी हा शब्द ऐकतो. कोण असतो हा अमॅकस क्युरी ?
एखाद्या क्लिष्ट प्रकरणात न्यायालय स्वत: वरिष्ठ वकील किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची नियुक्ती करते. प्रत्येक न्यायाधीशाला सर्वच विषयाची इत्यंभूत माहिती असतेच असं नसतं. त्यामुळे कोर्ट अमॅकस क्युरी अर्थात न्यायालय मित्राची नियुक्ती करते.
ही व्यक्ती संबंधित प्रकरणाच्या न्यायदानासाठी मदत करते. पण ही व्यक्ती त्या प्रकरणाशी संबंधित खटल्यामध्ये कोणत्याही अशिलाचा वकील नसते.
ही व्यक्ती संबंधित खटल्याचा अभ्यास करुन न्यायालयाला वेळोवेळी माहिती देऊन अहवाल सादर करते. त्यालाच अमॅकस क्युरी अथवा न्यायालयीन मित्र म्हणतात.
Leave a Reply