वरील तपासण्या खालील रोगांत प्रामुख्याने करतात. मधुमेह यासाठी रक्ताची उपाशीपोटी, जेवणानंतर दोन तासांनी तपासणी करतात. बरोबर लघवीपण तपासतात. यात रक्तातील साखर मोजतात. उपाशीपोटी साखरेचे प्रमाण ७० ते ११० मिलिग्रॅम परसेंट व जेवणानंतर १४० मिलिग्रॅम परसेंट असते.
यापेक्षा जास्त प्रमाण आढळल्यास व सातत्याने २-३ वेळा हे प्रमाण जास्त असल्यास मधुमेहाचे निदान करतात. मधुमेहात नंतरच्या काळात मायक्रोअलब्युमिन आढळते. नवीन आलेली तपासणी म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन लालरक्त पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असते. त्यामुळे साधारणतः तीन महिन्यांतील प्रमाण कळते. याचे प्रमाण ४.४ ते ६.६ परसेंट असते. वरती गेल्यास औषधोपचाराची आवश्यकता असते.
कोलेस्टेरॉलचे प्रमाण मधुमेहात वाढते आणि कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयरोग व अर्धांग यासारखे रोग होतात. कोलेस्टेरॉल साधारणतः २०० पेक्षा कमी असावे. यात ३४४ प्रकार असून, त्यातील एच. डी. प्रकार ५० च्या वरती असावा. यकृताच्या आजारात म्हणजे काविळीमध्ये यकृताच्या पेशींना सूज येते व दाह होतो त्यामुळे रक्तातील पित्ताचे (बाइलचे) प्रमाण वाढते काही एन्झाइम्स पण वाढतात. दुसऱ्या म्हणजे सिहासिसमध्ये रक्तातील अलब्युमिन कमी होते मग पायावर सूज, जलोदर वगैरे होण्याची शक्यता असते. किडनीच्या आजारात मूत्रांतून प्रथिने जातात. म्हणून रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
युरिया व क्रिएटीनिनचे प्रमाण वाढते. रक्ताच्या विशेष तपासण्या कर्करोगात करतात. उदा. सी. ए. १२५ अंडकोशाच्या कर्करोगात, सी. ए. १९.९ पित्ताशय स्वादुपिंडच्या आजारात तर पी. एस. ए. प्रोस्टेटच्या कर्करोगात वाढते. अलीकडे जास्त प्रमाणात आढळणारी विकृती थायरोइड (गलाग्रंथी) याचे अधिक किंवा कमी प्रमाणात कार्य यासाठी टी थ्री, टी फोर व टी. एस. एच. या तपासण्या कार्य कमी झाल्यास स्त्रियांचे वजन वाढते, कातडी सुखी पडते, स्नायूंची कमजोरी व उत्साहाची कमतरता जास्त झाल्यास वजन कमी, हृदयाचे ठोके वाढतात हाताला कंप येतो व चिडचिडेपणा वाढतो.
डॉ. चित्रलेखा सोमण
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply