ऋतु चक्राभोवती अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत. रंगीबेरंगी फुले हा त्या ऋतुचा आरसा म्हणूनच जणु कार्यरत असतात. त्या त्या ठराविक ऋतुमध्ये आपल्या स्वत:च्या सौंदर्याने त्या ऋतुचे सौंदर्य वर्णन करून दाखवणारी फुले!
निर्मळ आणि प्रसन्न अशा फुलांना पाहून कुणाला आनंद होत नसेल तर ते नवलच म्हणायचे. लहान थोर अशा साऱ्यांना स्वत: कडे आकर्षित करणारी ही फुले! बराच काळ एकटक नुसतं पाहत राहावं असे सुंदर रंग आणि रूप घेतलेली फुले इतकी टवटवीत असतात. त्यांना पाहूनच शीण कुठच्या कुठे पळून जातो. प्रसिद्ध फुलांची रंगीबेरंगी मोहक अशी फ्लॉवर फिल्ड हे जपानमधील एक विशेष आकर्षण आहे. ह्या मध्ये आवर्जून पाहावे असे दोन; विस्टेरिआ आणि नेमोफिला फ्लॉवर फेस्टिवल.
विस्टेरिआ (Wisteria)
शॉपिंग करण्यावाचून राहवत नाही असे विस्टेरिया स्पेशल पदार्थ, बिस्किटे, गोळ्या, सेंट,साबण तसेचविस्टेरिआ फ्लेवरचे आईस्क्रिमआणि बाकी अनेक सुंदर वस्तू इथे मिळतात.
ही फुले लाखांच्या घरात ३.५ हेक्टर्स एवढ्या मोठ्या जागेवर , एका टेकडीवर उगवतात. त्या टेकडीचे नाव ‘Miharashi No Oka Hill’
निळ्याची निळाई अनुभवता यावी अशी ही जागा. सब कुछ ब्लु!
हा निळा रंग निऑन कलर आहे असा सुद्धा कधी कधी भास होतो. इतका सुंदर रंग!
टेकडीवर पसरलेली फुले आणि बाजूने फिरणारे पर्यटक असे दृश्य पाहत आपण या टेकडीवर पुढे पुढे चढत जातो, अनेक फोटो काढले तरी समाधान होत नाही असा हा सुंदर परिसर आहे.
सिझन हा जपानी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे हे आपण मागील काही भागांमध्ये अनेकदा अनुभवले! प्रत्येक सिझनमध्ये आवर्जून पाहावी अशी अनेक फुले जपान मध्ये आढळून येतात.
Leave a Reply