नवीन लेखन...

विस्टेरिआ – नेमोफिला फ्लॉवर फेस्टिवल

ऋतु चक्राभोवती अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत. रंगीबेरंगी फुले हा त्या ऋतुचा आरसा म्हणूनच जणु कार्यरत असतात. त्या त्या ठराविक ऋतुमध्ये आपल्या स्वत:च्या सौंदर्याने त्या ऋतुचे सौंदर्य वर्णन करून दाखवणारी फुले!

निर्मळ आणि  प्रसन्न अशा फुलांना पाहून कुणाला आनंद होत नसेल तर ते नवलच म्हणायचे. लहान थोर अशा साऱ्यांना स्वत: कडे आकर्षित करणारी ही फुले! बराच काळ एकटक नुसतं पाहत राहावं असे सुंदर रंग आणि रूप घेतलेली फुले इतकी टवटवीत असतात. त्यांना पाहूनच शीण कुठच्या कुठे पळून जातो. प्रसिद्ध फुलांची रंगीबेरंगी मोहक अशी फ्लॉवर फिल्ड हे जपानमधील एक विशेष आकर्षण आहे. ह्या मध्ये आवर्जून पाहावे असे दोन; विस्टेरिआ आणि नेमोफिला फ्लॉवर फेस्टिवल.

विस्टेरिआ (Wisteria)

विस्टेरिआ एप्रिलच्या शेवटी – मेच्या सुरुवातीस पाहायला मिळतात.
५० सेमी लांबीपर्यंत आणि फक्त एका फि‍तीवर १०० तरी असतील ही फुलेफुलांचे घडच असतात हे जणू. द्राक्षाच्या बागा जशा दिसतात त्यासारखेच हे फुलांचे घड मांडवावर विसावलेले असतात. 
आपल्या इथे बहावा फुलतो थोडीफार त्यासारखीच  दिसणारी ही फुले. फिकट जांभळ्या कधी पिवळ्यापांढर्‍या व फिकट गुलाबी रंगात सुद्धा ही फुल माळ असते.
तोक्यो पासून जवळच असणार्‍या तोचिगी प्रीफेक्चर मधील ‘आशिकागा फ्लॉवर पार्क’ हे ठिकाण फार अप्रतिम आहे. पार्क मोठे असूनरेल्वे स्टेशन पासून जवळ आहे. पार्कच्याच नावाचे रेल्वे स्टेशन आहे. तोक्योवरून साधारण ९० मिनिटे लागतात. 
अशिकागा पार्क मध्ये मोहक सुवास असलेले हे विस्टेरिया त्यांच्या जांभळ्या जगात आपल्याला घेऊन जातात तेंव्हा आजूबाजूच्या गर्दीचा आणि डोक्यावरच्या रणरणत्या उन्हाचा सुद्धा विसर पडतो.१०० वर्षांपूर्वीचे एक झाड इथे आहे त्याच्या बाजूने विस्टेरिया सावली देणार्‍या मोठ्या छत्री सारख्या रचनेत बहरलेले दिसतात.
अत्यंत सुंदर रचनेत फुलवलेले विस्टेरिआ फुलांचे टनेल म्हणजे सुख! फुलांचे ताटवे वाऱ्या बरोबर हवेत झुलताना पाहत, त्यांचा मोहक सुगंधी दरवळ अनुभवत त्या बोगद्यांमधून फिरताना फार प्रसन्न वाटते. पर्यटकांची गर्दी कमी असेल तर अजूनच मन मोकळे, निवांत फिरता येते.
शॉपिंग करण्यावाचून राहवत नाही असे विस्टेरिया स्पेशल पदार्थबिस्किटेगोळ्यासेंट,साबण तसेचविस्टेरिआ फ्लेवरचे आईस्क्रिमआणि बाकी अनेक सुंदर वस्तू इथे मिळतात.
किता-क्युश्यु ह्या जपानच्या दक्षिणेकडे असलेल्या भागात ‘Kawachi Fuji Gardens‘ हे सुद्धा विस्टेरियासाठी  प्रसिद्ध ठिकाण आहे.
नेमोफिला (Baby Blue Eyes)
साधारणपणे ह्या फुलांचा हंगाम एप्रिल – मे असा असतो.
नेमोफिला ही उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारी औषधी जातीची (Herb) वनस्पती आहे असे म्हणतात. साधारण 20 सेमी उंच पर्यंत वाढते आणि फुल 2 ते सेमी एवढे मोठे असते.  
नेमोफिला बागांमध्ये सहसा मुख्य भूमिकेत न दिसता सहाय्यक भुमिका बजावते. परंतु ही फुले जपानच्या इबाराकी  प्रिफेक्चर मधल्या  ‘हिताची सी साईड पार्क‘ मध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसतात.
ही फुले लाखांच्या घरात  ३.५ हेक्टर्स एवढ्या मोठ्या जागेवर , एका टेकडीवर उगवतात. त्या टेकडीचे नाव ‘Miharashi No Oka Hill’ 
निळ्याची निळाई अनुभवता यावी अशी ही जागा. सब कुछ ब्लु!
टेकडीवर एक साथ फुलणारी फुले, निळे आकाश आणि निळा समुद्र अशी तिन्ही मंडळी आपल्याला सौंदर्याने भारावून टाकतात.  बाहेरून निळा व आतून पांढर्‍या रंगाची छटा असणारे नेमोफिला निराळेच दिसते.
हा निळा रंग निऑन कलर आहे असा सुद्धा कधी कधी भास होतो. इतका सुंदर रंग!

टेकडीवर पसरलेली फुले आणि बाजूने फिरणारे पर्यटक असे दृश्य पाहत आपण या टेकडीवर पुढे पुढे चढत जातो, अनेक फोटो काढले तरी समाधान होत नाही असा हा  सुंदर परिसर आहे.

हिताची पार्क खुप मोठे आहे. मनोरंजन करणारी इतर बरीच ठिकाणे इथे जवळपास आहेत.
अनेक सिझनल फुले इथे वर्ष भर पाहायला मिळतात.  जसे वसंत ऋतु मध्ये ट्यूलिप्स आणि नेमोफिला, उन्हाळ्याच्या सुरुवातीस गुलाबउन्हाळ्यात झिंनिया आणि सूर्यफूल, पावसाळ्यात आजीसाई म्हणजेच हायड्रेनजा,  शरद ऋतु मध्येकॉसमॉस, हिवाळ्यातआईस ट्यूलिप्स.
हिताची पार्क मध्ये नेमोफिला सिझन मध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. ह्या पार्क मध्ये सुद्धा नेमोफिला स्पेशल बऱयाच वस्तू व खाद्यपदार्थ मिळतात. अगदी नेमोफिला स्पेशल निळ्या रंगाचा करी राईस सुद्धा!
वरील दोन्ही पार्क पाहायला जायचे झाल्यास एक संपूर्ण दिवस अगदी आरामात जातो. पार्क च्या वेळा पाहून जाणे उत्तम. शक्यतो सकाळी लवकर गेल्यास ऊन आणि गर्दीचा होणारा अडसर कमी होऊ शकतो.

सिझन हा जपानी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे हे आपण मागील काही भागांमध्ये अनेकदा अनुभवले! प्रत्येक सिझनमध्ये आवर्जून पाहावी अशी अनेक फुले जपान मध्ये आढळून येतात.
ट्यूलिप्सहायड्रेनजासनफ्लॉवरस्पायडरलिलीकॉसमॉसलव्हेंडरपिंक मॉसइत्यादी;
काही माहितीची आणि काही नवीनच वाटणारी अशी अनेक फुले!
सुंदर दिसणारी ही फ्लॉवर फिल्ड्सएखाद्या कारणासाठी कुणी तरी मुद्दाम सजावट करून घ्यावी इतकी सुरेख  असतात. दर वेळी मला प्रश्न पडतो कसं काय ह्यांची लागवड केली जातेकशी विशेष काळजी घेतली जाते?  किती हौशी मंडळी ह्या कामात आपला जीव ओतून काम करत असावीत कोण जाणे!
फुलांचा बहर दिसू लागला की आनंदाला पारावर राहात नसेल. एवढे कष्ट घेऊन त्या कष्टांचे झालेले चीज पाहणे किती अतीव आनंदाने भरलेले असेल!
— प्रणाली भालचंद्र मराठे
Wisteria Nemophila Flower Festival, Japan

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..