दरवर्षी ६ मे हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर २००९ पासून हा दिवस साजरा केला जातो परंतु भारतात २०११ पासून अॅ्कॉर्डियन दिन साजरा करण्यास सुरवात झाली. पहिला जागतिक अॅकॉर्डियन दिवस हा पहिला अॅकॉर्डियन १८२९ ला बनविला गेला व त्याचे पेटंट ६ मे १८२९ रोजी व्हिएन्ना येथे ख्रिस्तीफर डिमेनी यांनी घेतले, या गोष्टीला १८० वर्षे झाली म्हणून ६ मे २००९ पासून जागतिक अॅकॉर्डियन दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.
भारतात बॉलीवूडमध्ये केसी लॉर्ड इनॉक डॅनियल्स ही नावे अॅकॉर्डियन मध्ये अग्रगण्य मानले जातात. केसी लॉर्ड यांची अॅकॉर्डियन वाजवण्याची एक विशिष्ट शैली होती आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अॅकॉर्डियन वादनाचा अंतर्भाव आहे. रुप तेरा मस्ताना आणि शर्मिली सारख्या अजरामर गीतांमधील अॅकॉर्डियन वादन त्यांनी स्वत: केले होते. ‘आराधना’तल्या ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यातले धुंद वातावरण क्षणात् उभे करणारा सुरुवातीचा तो थरारून टाकणारा अॅाकॉर्डियन या वाद्याचा पीस आणि नंतर अॅ कॉर्डियन आणि सॅक्सेफोन यांची जुगलबंदी सुरू असावी असे वाटणारे एकाहून एक सरस पीसेस, ‘है अपना दिल’ आणि ‘आईये मेहरबाँ’ गाण्यांतले ठेका धरायला लावणारे चायनीज टेंपल ब्लॉक्स, ‘तस्वीर तेरी दिल में’, ‘मुझे दुनियावालों शराबी न समझो’ अशा शेकडो गाण्यांमध्ये अॅाकॉर्डियनच्या बेलोजचा परिणामकारक वापर करून घेतला होता. तसेच मा.इनॉक डॅनियल्स हे सुद्धा भारतीय चित्रपट संगीतातील एक महान अॅकॉर्डियन वादक. त्यांचा टेक दोन-तीन तासांतच ओके होत असे.
व्हायोलिनचा चाळीस वादकांचा ताफा त्यांच्याकडे होता. जयकिशन बॅकग्राऊंड म्युझिकचा सम्राट होता.. सलील चौधरी स्वत: संयोजक, पियानोवादक असूनही इनॉक डॅनियल्स यांना सन्मानपूर्वक बोलावत. त्यांना पाश्चात्त्य संगीताची फार चांगली समज होती. सर्व सिंफनी त्यांच्या आवडत्या होत्या. ‘छाया’च्या ‘इतना ना मुझसे तू प्यार’मध्ये त्यांनी मोझार्टच्या सिंफनीचे स्वर घेतले आहेत. त्यांच्या रचना पूर्ण मेलडीवर असल्या तरी हार्मनीकडे त्यांचा कल होता. त्यामुळे त्यांच्या रचना हार्मनी-ओरिएंटेड आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उदात्त होते. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे मा.इनॉक डॅनियल्स यांच्या अॅनकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. बॉलीवूड मध्ये गुडी सिरवाई, मा.धीरजकुमार,मा. सुमित मिश्रा यांसारखे अॅजकॉर्डियन वादक होऊन गेले. याशिवाय शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, वसंत देसाई, सी.रामचंद्र यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अनारी, श्री ४२०, काला पानी, छाया, प्रेम पत्र, चोरी चोरी या चित्रपटांतील गीतात अॅकॉर्डियनचा प्रभावी पणे वापरला गेला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply