मानवी शरीराची रचना जितकी गुंतागुंतीची आहे तितकेच शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारे आजार अधिक जटिल आहेत. आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. कारण या आजाराचा अंदाज लागत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज, सोमवार ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आहे. लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस २००० साली प्रथम साजरा करण्यात आला. याची सुरूवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन डॉइश हिरंटुमरहिलफ यांनी केली होती. या संघटनेची स्थापना १९९८ साली झाली. यामध्ये १४ देशांमधील ५०० हून अधिक सदस्य आहेत. याच असोसिएशनने ८ जूनला ब्रेन ट्यूमर डे जाहीर केला. तेव्हापासून या आजाराविषयी जागरुकता आणण्यासाठी ८ जूनला हा दिवस साजरा केला जातो.
ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?
मेंदूमध्ये अनावश्यक पेशी वाढू लागतात. त्याचं गाठीत रुपांतर होतं. त्याला ब्रेन ट्यूमर म्हणतात. ब्रेन ट्यूमर बेनाईन आणि मॅलिग्नंट दोन प्रकारचा असतो. बेनाईन ट्यूमरमध्ये धोका कमी असतो.
आजाराची लक्षणे
१) तीव्र डोकेदुखी
२) जास्त प्रमाणात उलट्या होणे
३) अचानक तोल जाणे
४) ऐकायला आणि बोलायला त्रास होतो
उपचार
उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही.
संकलन: संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply