युनिसेफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे १२०० मुले रोज मृत्यूमुखी पडतात. मलेरिया हा विषाणूंपासून संक्रमित होतो. अॅहनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने, त्यांच्याद्वारा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही मलेरीया हा एक धोकादायक आजार ठरू शकतो.
ताप
ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षणं आहे. जर तुमच्या घराच्या परिसराजवळ पाण्याचे डबके असेल तर विशेष काळजी घ्या. ताप आल्यानंतर वेळीच डॉक्टरांकडे जा.
डोकेदुखी
मलेरियाच्या रुग्णांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. थंडी-तापासोबत जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच मलेरियाची तपासणी करून घ्या.
थंडी
मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. अशावेळेस डॉक्टर्स अनेकदा रक्ततपासणीचा सल्ला देतात. त्याद्वारे मलेरियाचे नेमके निदान करता येते.
घाम येणे
जर तुम्हाला मलेरिया असेल तर रुग्णाला थंडी, हुडहुडी भरण्यासोबतच सतत घाम येण्याचे प्रमाणदेखील अधिक असते. म्हणूनच मलेरियामुळे आरोग्याचे नुकसान होण्यापुर्वी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मळमळणे व उलट्या होणे
इतर अनेक विकारांप्रमाणेच मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळून येते. या सर्वसामान्य लक्षणांप्रमाणेच अंगदुखी, खोकला ही लक्षणं आढळतात. म्हणूनच अधिक दिवस ताप अंगावर काढण्यापेक्षा वेळीच योग्य तपासण्यांमधून मलेरियाचे निदान करा.डास हे मलेरियाचा प्रादुर्भाव होण्यास प्रमुख कारण असल्याने घर व घराजवळील परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply