जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची धडपड असते. आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच करतात. पण प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित यश मिळणार असे नसते तर कधीकधी अपयशाला ही सामोरे जावे लागते, पण त्या अपयशाला खचून न जाता जिद्द चिकाटीने आपल्या यशाची नौका पैलतीरी नेली पाहीजे. जिद्द चिकाटीच्या सारखी जागा जगात कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही. कुठलीही प्रतिभा, कुठलीच बुद्धिमत्ता, कुठलीच विद्वत्ता ,कोणीच नाही. जिद्द चिकाटी समोर कोणीच उभी राहू शकत नाही एवढे सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे ज्याच्या बळावर माणसाने एवढे शोध लावले एवढी प्रगती केली आणि ते यशस्वी झाले यशस्वी माणूस मेहनतीला सोडत नाही ज्याने सोडली तो कधी यशस्वी होत नाही यशाला नेहमी प्रयत्नांची जोड असायला हवी हजारो अपयश जीवनात आले असतील तर प्रयत्नाने यशाच्या निर्मळ झरा चा शोध लागतोच.
प्रयत्नाची ज्योत तेजस्वी, मनात पेटली पाहिजे
अपयशाच्या अंधाराला प्रकाशित केले पाहिजे
हवा तुला तर शोध यशाचा प्रयत्न तू सोडू नको
आत्मविश्वासाने प्रत्येक यश हलकेच जिंकले पाहिजे
आज माणसाने केलेली प्रगती त्यांच्या आत्मविश्वासानेच केली कारण कोणत्याही कामात करतांना ते जमेल का? माझ्याने झेपावेल का ?मी अपयशी ठरलो तर असे अनेक प्रश्न माणसाच्या मनात यायला लागतात आणि त्या निरर्थक प्रश्नांनी माणसाचा आत्मविश्वास कमी कमी व्हायला लागते परिणामी .आत्मविश्वासाच्या अभावी माणूस प्रयत्न करण्याआधीच आपला निर्णय मागे घेतो म्हणून असे न करता कोणत्याही गोष्टीला न घाबरता आत्मविश्वासाने त्याला सामोरे गेले पाहिजे . जीवना शिखर गाठायला निघणारे मोठ्या मेहनतीने शिखर गाठायला निघतात. पहिला असलेला उत्साह त्यांचा आत्मविश्वास वाढवतो,
पण तो उत्साह नेहमीच टिकून राहात नाही. थोडा थोडा आत्मविश्वास उत्साह कमी व्हायला लागतो.पण ह्याच वेळी त्यांचा आत्मविश्वास उत्साह टिकून आहे ते आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात ते शिखराच्या टोकापर्यंत मागे वळून पाहत नाहीत .त्यांच्या आत्मविश्वास त्यांचे मनोबल वाढवत राहते आणि असेच ध्येयवेडे जगातील कितीही उंच शिखर गाठण्यास यशस्वी होतात आपली मेहनत आपल्याला यशाची फळे दाखवते .म्हणून जेवढी मेहनत तेवढी फळे मधुर आणि जिथे परिश्रम नसेल नुसते फळाची आशा असेल तर ती अशा निरर्थक म्हणावी लागेल इतिहासात मोठ्या शास्त्रज्ञ विद्वान यांचे आत्मचरित्र वाचले की दिसून येईल त्यांनी जगात रस्त्याला इतिहास एकाच प्रयत्नातून नव्हे तर कितीही प्रयत्न करून या अपयशाला सामोरे जाऊन जास्त झाला आहे त्यांच्या प्रयत्नांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा कधीच न खचता प्रयत्न करीत रहावे जन्माला आलेल्या पाखरू आकाशात एकदम भरारी घेत नाही तर सुरुवातीला ते उडण्यासाठी प्रयत्न करते कधी जमिनीवर पडते आणि पुन्हा नव्या उमेदीने उडण्याचा प्रयत्न करते पाखरू आपले प्रयत्न तोवर सोडत नाही जोवर तो गगनात झेप घेत नाही आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना फळ मिळते व पाखरू नव्या उमेदीने गगनात उंच उंच झेप घेते. आई वडील लहानपासून मुलांना काहीतरी बनण्याचे स्वप्न दाखवतात त्याने काहीतरी नवीन करावा हा प्रयत्न तर असतोस सोबत व आदर्श माणूस बनवावा असे त्यांचे संस्कार असतात जीवनात सर्वच आशा मावळल्या की आई-वडिलांचे प्रेम त्यांचे संस्कार आपल्याला यशाचा नवीन मार्ग दाखवतात मुलांना जिद्दीचं बालवयापासूनच मिळायला हवा म्हणजे जीवनाचा निश्चित केलेला मार्ग सरळ आणि सोपा होईल जिथे आपले शिखर आहे तिथे पोहोचण्यासाठी आपली विचारशक्ती सदैव सक्रिय ठेवली पाहिजे, कुठला ही प्रवास गाठायचा गाठायचा म्हटलं की प्रवासाची टप्पे आलेच त्याच प्रमाणे आपल्या जीवन प्रवास असते त्यामध्ये अनेक टप्पे असतात या टप्प्यातून मार्गक्रमण करून प्रवास सुखाचा आनंदाचा करावा लागतो आपल्या प्रवासाचा यशाकडे ओढत नेत असताना अनेक जण मार्ग खेचण्याचा प्रयत्न करतात पण योग्य नियोजनाचा मुळे सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरतात व मेहनत ही माणसाचा तरी पोहोचवला जातो कोणत्याही स्पर्धेत उतरताना एक निश्चित पक्का करावा की शेवटी प्रयत्नातून निर्धार मार्ग घेतला गेला नाही पाहिजे मग येणारी परिस्थिती कितीही भयानक असू परिस्थितीला पाहून आपले सामर्थ्य वाढले पाहिजे जीवनाचा स्तर उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट कुठलीच नाही माणसाची योग्यता त्यांच्या विचारांच्या दृष्टिकोन सकारात्मक परिस्थिती बदलायला एक क्षणही लागत नाही परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा परिस्थितीला बदलण्यासाठी प्रयत्न करावेत कदाचित वाट पाहण्याचे आयुष्य निघून जाईल पण प्रयत्नाने परिस्थिती क्षणात बदलू शकेल पण हे सर्व कृतीतूनच साध्य होऊ शकते परिस्थितीला चेतावणी घटना रेस खरे ठरतात शेवटी नाण्याच्या दोन बाजू यश-अपयश हे जरी असले तरीही ह्या दोन्ही गोष्टींमुळे खऱ्या शिखराची किंमत कळते जगात काहीतरी नवीन करून आपलं नाव या क्षितिजावर करायची असेल तर स्वप्न पहा ध्येय गाठा जिद्द चिकाटीने पेटून उठा हजारो अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका कारण कठीण दगडाखाली अपयशाचा निर्मळ झरा असतो आणि तो सहजतेने मिळत नाही माणसाला प्रयत्नाने यशाचा झरा मिळतो……
— अॅड विशाखा समाधान बोरकर
रा.पातूर जी अकोला
Leave a Reply