चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. कै यशवंत दिनकर फडके यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडके यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. व एम्.ए. चे शिक्षण केले. १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्.डी. पदवी मिळवली. य. दि. फडके हे साहित्यिक, साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. २००० साली झालेल्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी मांडलेले संशोधन तसंच राजकीय विचारांवर त्यांनी केलेले भाष्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांची सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच र. धों. कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट अशा दिग्गजांची खरी ओळख त्यांनी चरित्र लिहून करून दिली. डॉ. आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी लिहिलेल्या टीकेला तसेच खणखणीत उत्तर त्यांनी दिले होते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास लिहून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे. यशवंत दिनकर फडके यांचे ११ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.
त्यांची साहित्यसंपदा
द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया- य दि फडके आणि आर. श्रीनिवासन, सेनापती बापट यांचे चरित्र
सोशल रिफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील समाजसुधारक, पॉलिटिक्स अॅन्ड लॅगवेज, वी के चिपळुणकर
वूमन इन महाराष्ट्र, आगरकर शोध बाळगोपाळांचा, रा. धो. कर्वे, केशवराव जेधे, नथुरामायण, आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, केतकर लेख संग्रह (संपादन – य. दि. फडके)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट