येरे मना, येरे मना
नको जावू दूर, दूर, दूर
येथे नाही रे आता
जीवाला हुर, हुर, हुर…..।।धृ।।
सोडूनी दे रे, ते तुझे
नवे, नवे बहाणे
सोडूनी दे रे ते तुझे
आज इथे अन उद्या तिथे
झुळझुळणाऱ्या वारुसंगे
नकोस उधळू दूर, दूर, दूर….।।१।।
चल पाहू या रे
विवेकी सुंदर गांव
चल घेवूया या रे
शांती सुखाचा श्वास
करू निर्धारी ते
दुःख पहाडी दूर, दूर, दूर….।।२।।
येईल रे येथे सारे
मंगलतेचे वारे
असेल येथे सारे
स्वर्गसुख ते सारे
सोडूनी ये सत्वर
स्वार्थ तुझा दूर, दूर, दूर….।।३।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २७९
१/११/२०२२
Leave a Reply