घर सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे शो-पीस, एंटिक पीसचा वापर करतो. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कार्यालयामधील वातावरण आनंदी वाटावे असे वाटत नाही का? कारण कार्यालयामधील कामकाजाचा कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचे ऑफिस कल्चर संबंधित केलेल्या अध्ययनानुसार नुसतेच समोर आले आहे. त्यामुळेच कार्यालयामधील वातावरणात बदल व्हावा, असे वाटत असेल तर आपल्या डेस्कला आवडीनुसार लूक द्या.
१. डेस्कवर विखुरलेल्या वस्तू नीट लावून ठेवा. कोणते पेपर्स आवश्यक आहेत व कोणते नाहीत हे नियमित पडताळा जेणेकरून अनावश्यक वस्तूंचा उगाच भरणा होणार नाही.
२. महत्त्वपूर्ण कागदपत्र फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवा, फाईलला नंबर द्या. त्याच्या डिटेल्सची नंबरनुसार लिस्ट बनवा जेणेकरून गरज असेल तेव्हा कागदपत्रे व फाईल वेळेवर मिळतील.
३. कामाबद्दल नियोजन करा. नंतर गोंधळ होण्याऐवजी एक डेस्क प्लॅनर तयार ठेवा. यामध्ये कामांची सूची व वेळ लिहून ठेवा. महत्त्वपूर्ण शेड्युल्स हायलाईट करा, ज्यामुळे विसरायला होणार नाही.
४. डेस्कच्या जवळपास कुटुंबाचा किंवा आपल्याला आवडेल असा फोटो ठेवा.
५. कार्यालयाची परवानगी असेल तर डेस्कजवळ एका छोट्या कुंडीत झाड लावा जेणेकरून काम करताना प्रसन्न वाटेल.
— पूजा प्रधान
Leave a Reply